Shivsena UBT: ठाकरेंच्या नगरसेवकांचं नेमकं चाललंय तरी काय? निवडून आले 'मशाल' चिन्हावर अन् उपस्थिती 'काँग्रेस'च्या स्टेजवर

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पाणी दरवाढीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आक्रमक झाली आहे. महानगरपालिका अकार्यक्षम आहे. शहरातील पाणी गळती रोखण्यात महापालिकेची यंत्रणा अपयशी आहे.
Shivsena UBT
Uddhav Thackeray announcing new youth leadership in Kolhapur to strengthen Shiv Sena’s local political strategy.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: महाविकास आघाडी असताना कोल्हापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचं नेतृत्व तत्कालीन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी केले होते. मात्र, अपेक्षित जागा न मिळाल्यानं अनेक शिवसैनिकांनी थेट नाराज होऊन पक्षाच्या विरोधातच लढण्याची भूमिका घेतली होती. त्याचा मोठा फटका पक्षासह महाविकास आघाडीला बसला होता. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची विस्कटलेली घडी आजतागायत पुन्हा बसलेली नसल्याचं वारंवार दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील गटबाजीचे ग्रहण संपण्याचं काही केल्या नाव घेताना दिसून येत नाही. जिल्हाप्रमुखांची फेरबदल झाल्यानंतरही आता स्वीकृत नगरसेवकांच्या कारभाराविषयी निष्ठावंत शिवसैनिकांनी थेट संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला आहे.

शिवसेनेचं नाव वापरून कोल्हापूर महापालिकेत गेल्यानंतर ते पक्षाच्या कोणत्याच उपक्रमाला उपस्थित राहत नसून दुसरीकडे काँग्रेसशी जवळीक साधून आहे. ते सर्वजण काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहतात. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीची भावना असल्याचं दूधवडकर यांच्या कानावर घातलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे बुधवारी(ता.16) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोल्हापुरातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि शिवसैनिकांकडून आढावा घेतला. यावेळी नगरसेवक मोदी यांच्याबदल काहीजणांनी खासगीत तक्रारी केल्या. शिवसैनिक असो वा वरिष्ठ पदाधिकारी त्याला शिवसेनेमध्ये मातोश्रीचा आदेश पाळावा लागतो.

Shivsena UBT
BJP-Shivsena clash : सत्तेत दोस्ती, महासभेत कुस्ती! उल्हासनगरात शिवसेना-भाजप आमने-सामने; ‘माझा बाप काढला’ म्हणत महापौरांनी दिले भाजप नगरसेवकाच्या निलंबनाचे आदेश

पुढे महापालिका निवडणुकीनंतर सुनील मोदी यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसात स्वीकृत नगरसेवक निवडीत काँग्रेसकडून त्यांना महापालिकेत पाठवण्यात आले. यां निवडीनंतर शिवसैनिकांचा असंतोष बाहेर पडला होता. त्यानंतरही मोदी हे आपण शिवसेनेचे प्रतिनिधी असल्याचे जाहीरपणे आणि समाजमाध्यमातून सांगत असल्याचे दिसून आले.

मात्र, गेल्या काही दिवसामध्ये नगरसेवक मोदी हे शिवसेनेचे अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली नाही. मात्र काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात ते उपस्थिती लावत असल्याच्या तक्रारी दूधवडकर यांच्याकडे करण्यात आल्या. त्यामुळे ते नेमके कोणाचे नगरसेवक आहेत. हे एकदा जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आले.

Shivsena UBT
EPFO News: सरकारचा मोठा निर्णय! EPFOची वेतन सीमा वाढवली; ५१ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक सुरक्षा

कोल्हापूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पाणी दरवाढीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आक्रमक झाली आहे. महानगरपालिका अकार्यक्षम आहे. शहरातील पाणी गळती रोखण्यात महापालिकेची यंत्रणा अपयशी आहे. शिवाय बोगस नळधारकांवर कारवाई करण्याचे धाडस महानगरपालिकेचे आयुक्त महापौर दाखवत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com