Someshwar sugar election 2026 : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; एकाच जागेवर शेकडो दावेदार, 'या' गटात थेट लढत

Someshwar Sugar Factory election, Someshwar Cooperative Sugar Factory update : सोमेश्वर कारखान्यात २१ जागांसाठी ५१४ उमेदवार रिंगणात; मांडकी-जवळार्जुन गटात सर्वाधिक इच्छुक, पॅनेल बांधणीसमोर पक्षांची कसरत.
Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory electionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा असतानाच आणखीनच गुंता वाटला आहे.

निवडणूक कार्यालयाने बुधवारी अंतिम यादी प्रसिद्ध केली असून, ५१४ जणांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. सुनावणीनंतर ४२ अर्ज बाद झाले, तर ४५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता सभासदांच्या अंतिम २१ जागांसाठी विविध पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल ६०१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननी प्रक्रियेत पात्र अर्जांची संख्या ५५६ झाली. त्यानंतर माघारीच्या प्रक्रियेत ४५ अर्ज मागे घेण्यात आले. अंतिम यादीत ५१४ उमेदवार राहिले आहेत. विशेष म्हणजे, मांडकी-जवळार्जुन गटातून सर्वाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची संख्या मोठी असल्याने आता राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. प्रत्येक गटातून अनेक इच्छुक असल्याने पॅनेलची अंतिम बांधणी करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला थांबवायचे, यावर नेत्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
NIA court verdict : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारासह 29 जण गेले; देश हादरविणाऱ्या हत्याकांडाचा 13 वर्षांनंतर लागला निकाल...

मुलाखतींचा धडाका सुरू

शिवसेनेच्या सुमारे चाळीस उमेदवारांच्या मुलाखती सासवड येथे नुकत्याच झाल्या. त्याचबरोबर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शंभरपेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सभासदांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मुलाखतीचीही उत्सुकता आहे. कारखान्याची २१ सप्टेंबर रोजी वार्षिक सभा होणार असून, त्यानंतर पॅनेल निश्चितीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडे सर्वाधिक सुमारे अडीचशे इच्छुक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सव्वाशेच्या आसपास, तर भाजपकडे शंभरच्या आसपास अर्ज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि गटासमोर इच्छुकांची संख्या कमी करून अंतिम पॅनेल उभे करण्याचे मोठे आव्हान आहे.

Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
BJP MP case : लोकसभेत काँग्रेसच्या ज्या नेत्याने केला पराभव, भाजप उमेदवाराचे त्यांच्याच लेकीशी लग्न; आता पत्नी खासदार, पण झाला घटस्फोट

माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार

अंतिम यादी जाहीर झाली असली तरी निवडणुकीचे खरे चित्र माघारीच्या टप्प्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पॅनेलनिहाय उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंडखोरी रोखणे, नाराजांची मनधरणी करणे आणि प्रत्येक गटातील मतांचे गणित जुळवणे, यासाठी नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे.

दरम्यान, सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघातील पंधरा जागांसाठी, पाच गटांत प्रत्येकी तीन जागा असून, सर्वाधिक जागांसाठी ३३५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांची संख्या कमी करण्याचे आव्हानही प्रमुख नेत्यांसमोर आहे. आता २१ सप्टेंबरच्या वार्षिक सभेकडे आणि त्यानंतर होणाऱ्या पॅनेलच्या अंतिम घोषणेकडे सोमेश्वरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com