Someshwar election : 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बिनविरोधसाठी पडद्यामागे सूत्रं हलली...

Someshwar election unopposed latest news : सोमेश्वरच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याची चर्चा आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत?
Someshwar election : 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बिनविरोधसाठी पडद्यामागे सूत्रं हलली...
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati News : बारामती परिसरातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 21 जागांसाठी तब्बल 514 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सुरुवातीला निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पवार कुटुंबीयांच्या बैठकीनंतर निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी या निवडणुकीत एकत्र येणार का, याकडे सभासदांसह बारामती तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Someshwar election : 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बिनविरोधसाठी पडद्यामागे सूत्रं हलली...
MPSC Exam Postponed : MPSC परीक्षा अचानक पुढे ढकलली; विद्यार्थ्यांमध्ये खळबळ, पाहा नवीन तारीख अन् महत्त्वाचा बदल...

पवार कुटुंबीयांची नुकतीच महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, बैठकीत नेमका काय निर्णय झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या अंतिम मुदत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे किती उमेदवार माघार घेतात आणि अंतिम रिंगणात किती उमेदवार राहतात, यावर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा बारामती परिसरातील शेतकरी आणि सभासदांसाठी महत्त्वाचा सहकारी संस्था मानला जातो. त्यामुळे संचालक मंडळाच्या निवडीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष आहे. 21 जागांसाठी दाखल झालेल्या 514 अर्जांमुळे निवडणुकीची उत्सुकता वाढली असतानाच आता बिनविरोध निवडीच्या चर्चेने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Someshwar election : 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बिनविरोधसाठी पडद्यामागे सूत्रं हलली...
RTO Fitness Scam: आरटीओ फिटनेस गैरव्यवहार! 735 बडे अधिकारी रडारवर; 300 जणांवर निलंबनाची टांगती तलवार!

अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्रत्यक्ष लढत होणार की बिनविरोध संचालक मंडळ निवडले जाणार, हे स्पष्ट होईल. त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजता सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचे अंतिम चित्र समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com