

Someshwarnagar, 08 May : निवडणुकीला अवघ्या चार महिन्यांची मुदत उरलेली असतानाच बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद बळवंत कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कांबळे यांना देण्यात आलेली मुदत ३ एप्रिल रोजी संपली होती. मात्र, निवडणुकीला अवघे चार महिने राहिले असल्याने त्यांचा राजीनाम घेतला जाणार की त्यांना मुदतवाढ मिळणार याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींना निरोप देताच मिलिंद कांबळे यांनी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे नवा उपाध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दूरदृष्टीमुळे गतवर्षी मिलिंद कांबळे यांच्या रूपाने सोमेश्वर साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच मागास प्रवर्गातील संचालकास उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती.
मिलिंद कांबळे यांना देण्यात आलेली मुदत ३ एप्रिल रोजी संपली होती. विहित मुदतीनंतर ते राजीनामा देणार की निवडणूक तोंडावर आल्याने मुदतवाढ मिळणार, याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले होते. अखेर पक्षश्रेष्ठींच्या निरोपानंतर त्यांनी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याची (Someshwar Sugar Factory) पंचवार्षिक निवडणूक चारच महिन्यांनी लागणार असली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पद मिळावे, यासाठी काहींनी फिल्डींग लावली आहे. आताच्या निवडीसाठी सामाजिक व प्रादेशिक समीकरणे कारणीभूत ठरणार आहेत.
‘सोमेश्वर’ कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यांत आहे. पुरंदर तालुक्यातील मोठे मतदान पाहता त्यांना दुसरी संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नेहमीच उपेक्षित राहिलेला खंडाळा किंवा बारामतीच्या जिराईत भागाचाही विचार होण्याची दाट शक्यता आहे.
अजितदादा, सुनेत्रावाहिनींमुळे उपाध्यक्ष बनलो : मिलिंद कांबळे
अजितदादा पवार, सुनेत्रावहिनी यांच्यामुळे मला नामांकित संस्थेचा पदाधिकारी बनता आले आणि अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचे काम करता आले, असे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी राजीनाम्यानंतर सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.