Nashik ACB News: महिला निरीक्षक निशा आढाव पाच हजाराची लाच घेताना रंगेहात सापळ्यात !

ACB Action In Nashik : हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याच्या अहवालासाठी लाचेची मागणी
Acb Action In Nashik :
Acb Action In Nashik :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News : हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) असे लाचखोर महिला निरीक्षकाचे नाव आहे. (Labour departments female Inspector claimed to be child labour in hotel for bribe)

नाशिक (Nashik) शहरात लाच घेण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) काल कामगार उपायुक्त कार्यालयातील महिला निरीक्षकाला लाच घेताना पकडले. मात्र याबाबतचा कायदा व कारवाई दोन्ही प्रभावी नसल्याने लाच घेण्यास कर्मचारी निर्ढावले आहेत.

Acb Action In Nashik :
Nashik NMC News : नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदावरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच !

कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत शहरातील आस्थापनांमध्ये शोध मोहीम राबवून बाल कामगारांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी दोन दिवसात भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये हॉटेल व गॅरेज चालकांविरोधात बाल कामगार ठेवल्याबद्दल गुन्हे दाखल केले जात आहेत. निशा आढाव यांनी बुधवारी (ता.१४) बाल कामगार कायद्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोन गॅरेज चालकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, ४० वर्षीय हॉटेल चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आढाव यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार आढाव यांनी मंगळवारी (ता.१३) तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये पाहणी करीत बाल कामगार आहे की नाही, याची खात्री केली.

तसेच हॉटेलमध्ये बाल कामगार असल्याची बतावणी करून तपासणी अहवालात बाल कामगार नसल्याचा अहवाल पाठविण्यासह गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आढाव यांनी हॉटेल चालकाकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

Acb Action In Nashik :
Nashik Lok Sabha Seat : भाजपची नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटावर कुरघोडी? हक्काची जागा असताना...

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आढाव यांना गुरुवारी (ता. १५) कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, पथकाने आढाव यांच्या घराचीही झडती घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.