Maharashtra teachers : दिवाळीची सुट्टी यंदा शिक्षकांची प्रशिक्षणातच जाणार; जनगणना ड्युटीमुळे प्रशिक्षण लांबले

Maharashtra teachers News : दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येते. मात्र, यंदा जनगणना कामासाठी शिक्षकांची नियुक्ती झाल्याने जूनमध्ये प्रशिक्षण घेता आले नाही.
  teachers
teachers Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : वर्षभर शाळेतील अध्यापन, परीक्षा, शैक्षणिक उपक्रम आणि प्रशासकीय कामांचा व्याप सांभाळल्यानंतर शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीची प्रतीक्षा असते. मात्र, यंदा ही सुट्टीही प्रशिक्षणासाठी खर्ची पडण्याची शक्यता आहे. जनगणना ड्युटीमुळे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे वेळापत्रक लांबले असून, आता हे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येते. मात्र, यंदा जनगणना कामासाठी शिक्षकांची नियुक्ती झाल्याने जूनमध्ये प्रशिक्षण घेता आले नाही. जनगणनेच्या कामामुळे पुढे ढकलण्यात आलेले प्रशिक्षण आता नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या मते, दिवाळीची सुट्टी ही वर्षभराच्या धावपळीनंतर मिळणारी विश्रांती असते. काही शिक्षक या काळात बाहेरगावी असलेल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी, तर काही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टीचे नियोजन करतात. त्यामुळे प्रशिक्षण आवश्यक असले तरी त्यासाठी दिवाळीची सुट्टी निवडल्याने आधीच केलेले नियोजन विस्कळीत होणार, अशी भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

  teachers
Maharashtra education department : शाळांच्या गुणवत्तेवर आता वरिष्ठांची नजर; अधिकारी थेट शाळेत जाऊन घेणार ‘ग्राउंड रिपोर्ट’

प्रशिक्षणाचे वेळापत्रक बदलण्याची मागणी

जनगणना ड्युटीमुळे प्रशिक्षण पुढे ढकलले गेले असेल, तर शिक्षकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी होत आहे. प्रशिक्षणासाठी नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्टीचा वापर करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात प्रशिक्षण घेण्याचा पर्यायही शिक्षकांकडून सुचविला जात आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आवश्यक अर्हताकारी सेवा पूर्ण करणारे शिक्षक या प्रशिक्षणासाठी पात्र असणार आहेत. एप्रिल आणि मे २०२६ मध्ये नोंदणी केलेल्या पात्र शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशिक्षण २०२६ साठी ऑनलाइन नोंदणीला बुधवारी (दि. ९) सुरुवात झाली आहे.

  teachers
Maharashtra Coaching Rules : खासगी क्लासेसची मनमानी आता बंद; फी वाढवता येणार नाही, तळघरात अन् 5 तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास कारवाई

सेवांतर्गत प्रशिक्षण एप्रिलमध्ये घेण्याची मागणी

शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबतही संघटनांकडून वेगळा पर्याय सुचविण्यात आला आहे. सेवांतर्गत प्रशिक्षण दरवर्षी घेण्यात येत असले तरी ते शिक्षकांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीत आयोजित न करता एप्रिल महिन्यात, विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले यांनी केली आहे. जनगणनेचे काम शिक्षकांकडून करून घेतल्यानंतर आता त्यांच्या हक्काच्या दिवाळी सुट्टीवरही प्रशिक्षणाचे नियोजन होत असल्याने प्रशासनाने वेळापत्रकाचा फेरविचार करावा, अशी मागणी शिक्षकांकडून जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com