Teacher Transfers : राज्य सरकारचा मोठा निर्णय, शिक्षकांचं स्वप्न धुळीस! यंदा मूळ गावी, सोयीच्या ठिकाणी बदली नाहीच

Teacher Transfers Census Work : केंद्रीय गृह सचिवांनी ११ मार्च २०२६ रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात जनगणनेच्या कामात शिक्षक, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांची भूमिका किती 'निर्णायक' आहे, यावर बोट ठेवले होते.
Teacher transfers halted as government prioritizes census work across the state.
Teacher transfers halted as government prioritizes census work across the state.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी 'जनगणना २०२६' चे राष्ट्रीय काम सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील 'गट-क' आणि 'गट-ड' संवर्गातील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामागे केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. केंद्रीय गृह सचिवांनी ११ मार्च २०२६ रोजी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात जनगणनेच्या कामात शिक्षक, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांची भूमिका किती 'निर्णायक' आहे, यावर बोट ठेवले होते. जनगणनेच्या मध्यकाळात जर मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या, तर या राष्ट्रीय कामात गंभीर प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात, ही भीती केंद्र सरकारने व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा 'ब्रेक' लावण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे जनगणनेचे वेळापत्रक

केंद्र सरकारने २०२६ च्या जनगणनेचे जे वेळापत्रक जाहीर केले आहे, त्यानुसार १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्यासाठी 'स्व गणना' कालावधी असेल त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ ला जनगणनेचा प्रत्यक्ष पहिला टप्पा पर पडेल.

या प्रक्रियेसाठी राज्यात सुमारे २ लाख ६४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक डिजिटल पद्धतीने घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. इतक्या मोठ्या मनुष्यबळाचे नियोजन विस्कळीत होऊ नये, हाच शासनाचा मुख्य हेतू आहे.

Teacher transfers halted as government prioritizes census work across the state.
Teachers recruitment : पवित्र पोर्टलवरून भरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता नवा निकष, तुम्हाला माहिती आहे का?

शिक्षकांच्या अपेक्षांवर पाणी

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडते. अनेक शिक्षक वर्षानुवर्षे आपल्या मूळ गावी किंवा सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून चातकासारखी वाट पाहत असतात. मात्र, यंदा या प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने लाखो कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत नियोजनावर आणि अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

आदेशाचे पालन अनिवार्य

ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी सर्व जिल्हा परिषदांना या निर्णयाचे कडक पालन करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ आदेश देऊन शासन थांबलेले नाही, तर या निर्णयाची अंमलबजावणी करून त्याचा 'अनुपालन अहवाल' सादर करण्याचे निर्देशही लेखी स्वरूपात देण्यात आले आहेत.

Teacher transfers halted as government prioritizes census work across the state.
Census Employees Transfer News: जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक? केंद्राचा आदेश; महाराष्ट्रात काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com