TET Exam Scam : पैशाचे वाटप कसे झाले, हे पोलिसांनी शोधून काढले

TET exam Scam मध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली...
TET Exam Scam
TET Exam Scam Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam Scam) २०१८ च्या परीक्षेतील गैरव्यवहारात जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

TET Exam Scam
राणेंचे 'बाॅय'ला तत्परतेने उत्तर : सुशांतसिंगच्या मृत्यूची आठवण करून देत म्हणाले....

याप्रकरणात अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) व अंकुश हरकळ (वय ४२, रा.सिंदखेडराजा, बुलढाणा) यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटांकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला देण्यात आले. आश्विनकुमार याने टीईटी -२०१८ मधील ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी रुपये जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना २० लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास ३० लाख रुपये दिले.

सुपे यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात ते नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत असताना त्यांच्या ओळखीचे दीपक सखाराम व्याळीज यांच्या मुलास परीक्षेत पास करण्याकरिता व प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्याने एका अनोळखी व्यक्तीमार्फत व्याळीज यांच्या मुलाचे हॉल तिकीट घेतले व काम झाल्यानंतर दोन ते तीन लाख रुपये देण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांडमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.

TET Exam Scam
Video: औरंगाबादेत काॅंग्रेसला राष्ट्रवादीचा धक्का, अजित पवार

आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी :

संतोष आणि हरकळ व अंकुश हरकळ यांचे तपासा दरम्यान त्यांच्याकडून परीक्षार्थींची यादी व पैसे घेतलेल्यांची यादी मिळून आल्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात करीत आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी संतोष व अंकुश हरकळ आणि सुपे यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आरोग्य भरती गट-क परीक्षा पेपरफुटीमधील आरोपी अतुल राख याला देखील २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुचविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com