Eknath Shinde and Ayodhya : ठाकरेंनी अयोध्येला नेण्याचे टाळले; म्हणून आता मुख्यमंत्री शिंदेंचा सर्व आमदारांसोबत दौरा !

Ayodhya Tour of CM : शिवसेनेच्या आयोध्या दौऱ्याचे नियोजन भाजपच्या नेत्यांकडे
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shinde vs Thackeray : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ एप्रिलपासून आयोध्या दौरा नियोजित आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे शनिवारी (ता. ८) सायंकाळी विमानाने उत्तर प्रदेशसाठी रवाना होणार आहेत. ते लखनौ येथे ते मुक्काम करतील. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही असणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाणे आणि नाशिक येथून सुमारे तीन हजार शिवसैनिक रेल्वेने आयोध्यासाठी रवाना झाले आहेत. ठाणे येथे शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वे स्थानकावर आले होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Jitendra Awhad : रॅप साँग करणाऱ्या दोघांना अटक; जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त करत केली थेट मोठी घोषणा

देश आणि राज्यात हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या राजकिय पक्ष आयोध्या दौरा करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आयोध्या दौरा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांसोबत गेल्यानंतर ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याची टीका झाली होती. त्याला उत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री ठाकरे आयोध्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी 'मी भाजपला सोडलेय हिंदुत्वाला नाही', असे ठणकावून सांगितले होते. त्यामुळे त्यांचा दौरा चांगलाच गाजला होता.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Khatav News : सत्तेसाठी लाचार कॉंग्रेस, ठाकरे शिवसेना हिंदूत्व विसरली : जयकुमार गोरे

उद्धव ठाकरे दीड वर्षांच्या कालावधीत तीन वेळा आयोध्याला गेले होते. यातून त्यांना भाजपवर दाबाव आणायचा होता. तसेच राजकारणातील आपली हिंदुत्वाची भूमिका कायम आहे, हे दाखवून द्यायचे होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप नेते खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी विरोध केला होता. तर आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याचे स्वागत केले होते. या वादाच्या पार्श्वभूमिवर आदित्य ठाकरेंचा दौरा चर्चेत राहिला होता.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Satara Congress : काँग्रेसच्या पोस्ट कार्ड कम्पेनिंगला प्रारंभ; मोदींना एक लाख पत्रे पाठवणार...

दरम्यान, शिवसेनेनेतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना आयोध्या दौऱ्यावर जाण्याची इच्छा होती. मात्र त्यांना आयोध्याला नेण्यात आले नाही. त्यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचा मुलागा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचाही समावेश होता. माजी मुख्यमंत्री ठाकरे आणि इतर नेत्यांनी जाणीवपूर्वक आमदार, खासदरांना आयोध्या दौऱ्यावर नेले नसल्याची त्यावेळी राज्यात चर्चा रंगली होती.

या चर्चेस बंडानंतर शिंदे गटातील काही आमदारांनीही पुष्टी दिली होती. ठाकरे सरकार असताना आम्हाला आयोध्या दौऱ्याला नेले नाही, अशी खंत सत्ताधारी शिवसेनेतील अनेक नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखविलेली आहे. त्याला उत्तर म्हणूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shirur News : विनापरवाना वृक्षतोड : शिरूर पंचायत समितीला अद्दलच घडली; दंड अन्‌ बरंच काही....

आता शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पहिलाच आयोध्या दौरा आहे. त्या दौऱ्यात शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार सहभागी होणार आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यासाठी भाजपचे नेते गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर दौऱ्याची जबाबदारी सोपविली आहे. ते उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांशी समन्वय साधून हा दौरा यशस्वी पार पाडणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com