Khed Politics : ठाकरे गटाने तेल ओतले; मोहितेंना डावलून चालणार नाही, खांडेभराडांचा पोखरकरांना टोला

Mahayuti News : पोखरकर खेड पंचायत समितीचे सभापती असताना त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदस्यांनी बंड केले होते. त्याला आमदार मोहिते यांची फूस असल्याचा आरोप पोखरकर यांनी केला होता.
Bhagwan Pokharkar-Dilip Mohite-Ashok Khandebharad
Bhagwan Pokharkar-Dilip Mohite-Ashok KhandebharadSarkarnama
Published on
Updated on

Khed Political News : आमची महायुती आहे, असे सांगायचे आणि महायुतीच्या नेत्यांचा नामोल्लेख टाळायचा, हे काही बरं नाही. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही आहे आणि आमदार दिलीप मोहिते हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तुम्ही आमदार मोहिते यांचा उल्लेख केला नाही, असा टोला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांना लगावला. त्यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादीत भांडण लावण्याची संधी ठाकरे गटाने काही सोडली नाही. (Thackeray group's Ashok Khandebharad criticized Shinde group's Bhagwan Pokharkar)

खेड तालुक्यातील आंबेठाण येथील माजी उपसरपंच भानुदास दवणे यांच्या वडिलांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात ही राजकीय जुगलबंदी पहायला मिळाली. खरं तर दशक्रिया विधी हा दुःखाचा प्रसंग असूनही त्या ठिकाणी राजकीय कुरघोडीचा खेळ पहायाला मिळालाच. या कार्यक्रमाला दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह तालुक्यात प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती.

Bhagwan Pokharkar-Dilip Mohite-Ashok Khandebharad
Solapur NCP : पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट; सोलापूर शहराला 9 वर्षांनंतर मिळणार नवा अध्यक्ष...

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पोखरकर यांनी शिवसेना पक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्वतःसह महायुतीच्या सर्व नेत्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उठलेले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी जोरदार बॅटिंग केली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पोखरकर हे महायुतीमधील महत्वाच्या नेत्याचे नाव घ्यायला विसरले होते आणि ती संधी साधत खांडेभराड यांनी त्यांना कोंडीत पकडले.

महायुतीच्या नेत्यांच्या वतीने आपण श्रद्धांजली वाहिली, ही चांगली बाब आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीमध्ये सामील आहे. पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे नाव घेतले नाही. खांडेभराड यांनी पोखरकरांना कोंडीत पकडल्याचे दिसून येताच उपस्थितांनीही दाद दिली. आमदार माहिते हे महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचे नाव डावलणे योग्य नाही, असे खांडेभराड यांनी स्पष्ट केले.

Bhagwan Pokharkar-Dilip Mohite-Ashok Khandebharad
Siddhanath Sugar Factory : कंचेश्वर विकला,सिद्धनाथ अडचणीत; ‘दक्षिण’च्या मोहिमेवर निघालेल्या मानेंपुढे संकटांची मालिका...

आमदार दिलीप मोहिते आणि भगवान पोखरकर यांच्यातील वाद सर्व पुणे जिल्ह्याला माहिती आहे. पोखरकर खेड पंचायत समितीचे सभापती असताना त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदस्यांनी बंड केले होते. त्याला आमदार मोहिते यांची फूस असल्याचा आरोप पोखरकर यांनी केला होता. त्यानंतर पोखरकर यांनी केलेला गोळीबार, खासदार संजय राऊत यांनी मोहितेंना दिलेले आव्हान यामुळे हा वाद राज्यभरात पोहोचला होता.

तीच खपली काढत अशोक खांडेभराड यांनी भगवान पोखरकर यांना डिवचले. पोखरकर यांचे भाषण अगोदर झाल्यामुळे त्यांना स्पष्टीकरणाची संधी मिळाली नाही. मात्र ठाकरे गटाने महायुतीने तेल ओतण्याची संधी सोडली नाही.

Bhagwan Pokharkar-Dilip Mohite-Ashok Khandebharad
Sangli District Planning Committee : नियोजन समितीवर अजितदादा गटाचे वर्चस्व; पण भाजप अन्‌ शिंदे गटालाही बरोबरचे स्थान

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष राज्यस्तरावर एकत्र आले असले स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे पहायला मिळत नाही. राजगुरूनगर येथील कार्यक्रमात दोन दिवसांपूर्वी आमदार मोहिते यांनी सत्तेत सहभागी झाल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यातील ही बेबनावाचा फायदा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेणे स्वाभाविक आहे.

Edited By : Vijay Dudhale

Bhagwan Pokharkar-Dilip Mohite-Ashok Khandebharad
Lok Sabha Election 2024 : अजितदादांच्या आव्हानाला शरद पवार दाखवणार अस्मान? वळसेंच्या होमपिचवर कोल्हेंसाठी फिल्डिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com