सोमय्यांवर हल्ला झालेल्या ठिकाणापासून भाजपाचे कार्यालय दोन मिनिटांच्या अंतरावर

पुण्यातील जम्बो कोवीड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणासाठी सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुणे महापालिकेत हल्ला झाला. या जागेपासून पक्षाचे नवे शहर कार्यालय केवळ पायी दोन मिनिटांच्या अंतरावर आहे.विशेष म्हणजे पुण्यात आल्यानंतर नेहमी त्यांच्यासोबत असणारे पुण्यातील कार्यकर्तेदेखील यावेळी त्यांच्याबरोबर नव्हते.

Kirit Somaiya
आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान ; म्हणाले, 'लढाई आता सुरु'

पुण्यातील जम्बो कोवीड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणासाठी सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना ते चौकशीच्या मागणीचे निवेदन देणार होते.दुपारी चारच्या सुमारास सोमय्या महापालिकेत पोचले.महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या जुन्या प्रवेशद्वारावर काही शिवसैनिक त्यांना निवेदन देण्यासाठी आले. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.यावेळी काहीजणांच्या हातात मोठमोठे दगड होते, असे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी सांगितले.

Kirit Somaiya
भाजपनं आशिष शेलारांना दिली मोठी जबाबदारी

जम्बो कोवीडमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आधी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्यावेळी शिवाजीनगर मतदारसंघातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते.शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून निघून ते पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना निवेदन देऊन मुंबईला निघणार होते.वास्तविक सोमय्या यांनी गेल्या दोन वर्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेशी संबंधित विविध नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे जनतेसमोर आणली आहे.मग या प्रकरणातच त्यांच्यावर हल्ला होण्याचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यातल्या जम्बो कोवीडच्या चौकशीच्या मागणीचा इतका राग कुणाला आला, असेही विचारण्यात येऊ लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी जाहीर केल्यानंतर आज सकाळी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,अद्याप आरोपींना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.पोलीस आरोपींना लवकरात लवकर शोधून अटक करणार का असाही प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com