EVM Machine Stolen : निवडणुका तोंडावर अन् तहसील कार्यालयातून EVM कंट्रोल युनिटच लंपास...

EVM Machine Stolen : सुटीची संधी साधत चोरट्यांनी साधला डाव...
EVM Machine Stolen
EVM Machine StolenSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून चक्क निवडणूक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम कंट्रोल युनिटची चोरी करण्यात आली आहे. पूर्ण कंट्रोल युनिटच लंपास केले गेले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. सासवड परिसरातील तहसील कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, यामध्ये आता चोरीची घटना घडल्यामे खळबळ उडाली आहे. (EVM Machine Stolen)

EVM Machine Stolen
Pune News : शिंदेंचे खासदार अन् भाजप आमदारामध्ये 'टेंडर'वरून वाद; अधिकाऱ्यांवर दबाब...

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सरकारी नियमाप्रमाणे दोन शनिवार आणि रविवारी कार्यालयाला सुट्टी असते. त्यामुळे ही सुटीची संधी साधून चोरट्यांनी मशीनची चोरी केली. सोमवारी अकरा वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी जेव्हा कार्यालयात पोहोचले, तेव्हा कुलूप तोडले गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Latest Marathi News)

EVM Machine Stolen
Ganpat Gaikwad News : आमदार गणपत गायकवाड यांनी केला अन्नत्याग?

या नंतर सदर घटनेची माहिती पोलिसांनी कळविण्यात आले. ईव्हीएम मशीन अन इतर साहित्यातून चक्कं एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट लंपास करण्यात आले आहे. ही चोरी म्हणजे अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. आता संबंधित घटनेची पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. त्यानुसार पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com