Pune Corporation News : पालिका शाळेत शिकणाऱ्या तब्बल 38 हजार विद्यार्थिनींना नित्य नियमाने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येते. मात्र, टेंडर प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन मिळाले नाहीत. भाजप ( Bjp ) आमदार आणि शिंदे गटाचे खासदार यांनी शिफारस केलेल्या ठेकेदाराला टेंडर मिळावे, या अट्टहासामुळे प्रकिया पूर्ण झाली नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
याप्रकरणामुळे सरकारची ( Shinde Government ) नाचक्की होत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी वैयक्तिक खर्चातून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन वाटप केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महापालिकेच्या ( Pune Corporation ) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना पालिकेच्यावतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात येते. आठवी, नववी आणि दहावीच्या तब्बल 38 हजार विद्यार्थिनींना याचा लाभ मिळत होता. पण, गेल्या दोन वर्षापासून पालिकेत प्रशासक राज आहे. या प्रशासक राजमध्ये मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यामध्ये टक्केवारीवरून वाद सुरू आहे. टेंडर कोणाला द्यायचं यावरून भाजपचे खासदार आणि आमदार आमने-सामने आले आहेत. आपण शिफारस केलेल्या ठेकेदारालाच हे काम मिळावे यासाठी हे दोघेही आग्रही आहेत. याचा फटका या टेंडर प्रक्रियेला बसला आहे. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटातील शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि पुण्यातील कॅन्टोमेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे याच्यात सॅनिटरी नॅपकिनच्या टेंडरवरून वाद सुरू आहे. या प्रक्रियेतून पैशांचा घोटाळा होत असल्याचा देखील आरोप काँग्रेसने केला आहे.
प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिकेच्या शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप केलं. भानगिरे म्हणाले, "दोन-तीन वर्षापासून सॅनिटरी नॅपकिनचे टेंडर वादाच्या भोवाऱ्यात सापडले असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा विषय महत्वाचा असल्यानं शिवसेनेनं सॅनिटरी नॅपकिनचं वाटप केलं. आमचं सरकार असलं तरी या विषयाकडे आम्ही राजकीय दृष्ट्या पाहत नाही. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या निविदा प्रकियेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन वाटप केलं."
( Edited By : Akshay Sabale )
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.