

Shivraj More: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच खोटे व्हिडिओ प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुण्यातील रस्त्यावरील काही तरुणांच्या वादावादीचा एक व्हिडिओ शेअर करत हा आरोप करण्यात आला होता.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवराज मोरे म्हणाले, ‘‘संकटात सापडलेल्या एका मुलीच्या संरक्षणासाठी मी धावून गेलो होतो. त्याला भाजप गुंडगिरी म्हणत असेल, तर बहिणीच्या संरक्षणासाठी मी पाचशे वेळा अशी गुंडगिरी करेन,’’ तसंच, खोटे व्हिडिओ प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी बन यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना शिवराज मोरे म्हणाले, ‘‘३ ऑक्टोबरच्या रात्री कोरेगाव पार्क परिसरात एका तरुणीला एका तरुणाकडून आणि त्याच्या साथीदारांकडून त्रास दिला जात होता. मदतीसाठी फोन आल्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलो आणि तरुणीची सुटका केली तसंच पोलिसांत तक्रारही दाखल केली. मात्र, भाजपच्या आयटी सेलनं घटनेचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून आमची बदनामी केली’’
दरम्यान, संबंधित तरुणीनेही मोरे यांची पाठराखण केली. ‘‘शिवराज दादा सख्ख्या भावाप्रमाणे मदतीला धावून आले. संबंधित तरुण मला धमकावत होता आणि माझ्यावर धावून आला होता. राजकीय फायद्यासाठी माझे चारित्र्यहनन केले जात आहे,’’ असा दावा तिने केला. तसेच ‘‘सत्य सर्वांसमोर यावे यासाठी माझी आणि नवनाथ बन यांची नार्को चाचणी करा,’’ असे खुले आव्हान मोरे यांनी दिले. सध्या सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपण सक्रिय असल्याने जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.