

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता शुक्रवारी दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या भागात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्या भागात पहिल्यांदा दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी अमरावती विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली होती. या भागात पावसाअभावी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागातील पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना लवकरच मदतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. .
मुंबईत पोहचताच सीएम फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी पहिला जीआर काढणार असल्याचे स्पष्ट केले.पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. विशेष: सोयाबीन असेल, काही भागातील कापूस असेल उडीद असेल, तूर असेल सगळ्या पिकांवर आपल्याला या ठिकाणी संकट पहायला मिळत आहे. म्हणूनच हा दौरा करून शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, हा आमचा प्रयत्न असल्याचे सीएम फडणवीस म्हणाले.
आपली दुष्काळाची जी संहिता आहे, त्या संहितानुसार ट्रिगर वन प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याचा जो काही शासन आदेश आहे, तो आदेश आम्ही काढणार आहोत. कदाचित त्यामध्ये एखादा दुष्काळी भाग सुटला तर ट्रिगर थ्री प्रमाणे आम्ही त्या भागाचा समावेश करू, पण सकृतदर्शनी राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसून येत आहे, असा सर्व भाग जिथे दुष्काळ दिसत आहे, त्या सर्व भागाचा समावेश आम्ही यामध्ये करणार आहोत. शेतकऱ्यांना आपल्याला वेगवेगळी मदत करावी लागणार आहे. विशेष: चाऱ्याची टंचाई, पाण्याची टंचाई या संदर्भांत आपण कार्यवाही करणार आहोत, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री गुरुवारी वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड तालुक्यातील म्हसला दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्या आपण कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत, असे थेट फडणवीसांना जाहीर केले. आपण सगळ्यांना सर्व मदत आपण करणार आहोत. आपण शेतकऱ्यांना विम्याचेसुद्धा पैसे देणार आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.