आम्ही सुद्धा २५ वर्ष नको ती अंडी उबवली, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती (Baramati) येथे इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
Uddhav Thackeray & Devendra FadnavisSarkaranama
Published on
Updated on

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता.2 नोव्हेंबर) बारामती (Baramati) येथे इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पवार कुटुंबीयांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, आपल्या भाषणातून आपल्या जुना मित्र असलेल्या भाजपला (BJP) मात्र, चिमटे काढले आहे.

Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
सकाळी भुजबळांचे कौतुक करून दुपारी पंकजा मुंडे सुहास कांदेंना भेटल्या!

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. आम्हीही ते २५-३० वर्ष उघडले होते. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झाले ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपले काम आपण केले. पुढे काय करायचे हे त्यांनी ठरवायचे असते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
फडणवीसांच्या बॉम्बची शेलारांनी दाखवली मलिकांंना भीती

ठाकरे म्हणाले, राजकारणात टीकाकार असतात, असलेच पाहिजेत, आम्हीही इतकी वर्ष तुमचे टीकाकार होतोच. शिवसेना प्रमुख आणि पवार साहेबांची मैत्री जगजाहीर आहे. ते मला म्हणायचे की बारामतीत जाऊन एकदा ते शरद पवार काय करतायत ते पाहायला हवे. पाठिंबा जरी देता येत नसला, तरी त्यात विघ्न आणू नये. विघ्नसंतोषी खूप आहेत. पण या कामातून जो आनंद मिळतो, तो त्या विघ्नसंतोषींना कधीच मिळणार नाही. असा विरोधकांना टोला लगावला आहे.

पुण्यानंतर बारामती केंद्र

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले, मला येताना अजित पवार म्हणाले की बारामती हे आता पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं केंद्र बनेल. तेवढ्यात अजित पवारांनी त्यांना हटकले आणि 'शिक्षणाचे' अशी मिश्किल सुधारणा सुचवली, यावरून सभागृहात एकच हशा पिकला. यावर ठाकरे म्हणाले, "हो शिक्षणाचेच. राजकारणाचेही आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. आपण आपले मिळून धडा शिकवण्याचे काम करू असा इशारी देखील त्यांनी विरोधकांना दिला.

फडणवीसांना टोला

कुणीतरी दिवाळनंतर बॉम्ब फोडणार आहे. मात्र, आवाज येऊ द्या, नुसता धूर काढू नका, असा टोला मख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांना नाव न घेता लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com