Pune News: भाजपशी पंगा घेणाऱ्या शिंदेंच्या नेत्यासाठी आता ठाकरेंचा वकील मैदानात; धंगेकरांसाठी कोर्टात ताकद लावणार

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी वरून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Ravindra Dhangekar eknath shinde uddhav Thackeray  (1).jpg
Ravindra Dhangekar eknath shinde uddhav Thackeray (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी वरून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या सर्व प्रकरणांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस लढणारे वकील रवींद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) बाजूने मैदानात उतरले आहेत.

कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर हे सातत्याने भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका करताना पाहायला मिळत आहे. मात्र ही टीका करत असताना रवींद्र धंगेकर हे सातत्यान समीर पाटील या व्यक्तीचे नाव घेत आहे.

समीर पाटील हा व्यक्ती चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वरदहस्ताने कोथरूडमधील गुन्हेगारी पोसत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर समीर पाटील यांनी या प्रकरणांमध्ये आता रवींद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. समीर पाटील तब्बल 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात दाखल करणार आहेत.

या दाव्यामध्ये अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी धंगेकरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी जी सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे. या लढाईमध्ये असीम सरोदे हे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडत आहेत.

Ravindra Dhangekar eknath shinde uddhav Thackeray  (1).jpg
Chhagan Bhujbal : येवल्यात जातीय समीकरणांचा प्रभाव दिसणार, मंत्री भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक

तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या इतर प्रकरणांमध्ये देखील असीम सरोदे हे त्यांना कायदेशीर सल्ला देत असतात आता त्याच असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांचे नेते असलेल्या रवींद्र धंगेकर यांच्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत त्यांनी पोस्ट केली आहे.

असीम सरोदे म्हणाले, पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत आणि गुन्हेगारीला पोसणाऱ्या राजकारणाबद्दल स्पष्टपणे बोलले, ते पुणेकरांच्या हिताचे बोलल्याने आम्ही त्यांच्यासोबत आहे.

Ravindra Dhangekar eknath shinde uddhav Thackeray  (1).jpg
Barshi Politic's : राजेंद्र राऊतांच्या 20 वर्षांच्या सत्तेला आमदार दिलीप सोपलांचे कडवे चॅलेंज; विश्वास बारबोलेंची साथही मिळणार

समीर पाटील नावाच्या व्यक्तीने रवींद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीची केस दाखल करणार असे सांगितले आहे. मी आणि आमची वकिलांची टीम रवींद्र धंगेकर यांच्यासोबत उभे राहू.अस असीम सरोदे म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com