Shivsena Vs NCP : ठाकरेंचे शिवसैनिक सुळेंवर नाराज; पण अंधारे म्हणतात, 'आम्ही ढाल तलवारी काढल्या नाहीत...'

Sushma Andhare On NCP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये नेमकं कशा प्रकारचे नाराजीनाट्य रंगले याबाबतची माहिती नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
Uddhav Thackeray & Sharad Pawar
Uddhav Thackeray & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. महाविकास आघाडीतील नेते एकामेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यामधील बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना (Uddhav Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये नेमकं कशा प्रकारचे नाराजीनाट्य रंगले याबाबतची माहिती नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. अंधारे म्हणाल्या, इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदरच्या पदाधिकाऱ्यांनी काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. मात्र ती नाराजी पक्षाबाबत नसून खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत होती.

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान छातीच्या कोट करून आम्ही काम केलं मात्र सुप्रिया सुळे यांच्याकडून ज्या पद्धतीचा प्रतिसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मिळायला हवा तसा मिळत नाही अशी तक्रार पदाधिकाऱ्यांची होती.

Uddhav Thackeray & Sharad Pawar
Sanjay Shirsat On Shivsena UBT : एकनाथ शिंदेंनी एक इशारा केला तर उद्धव सेनेचे सगळे आमदार आमच्याकडे येतील!

सुप्रिया सुळे यांच्याबाबतचे नाराजी म्हणजे लगेच ढाल-तलवारी काढल्या असं नाही. ताई आमच्या हक्काच्या आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर नाराज होण्याचा हक्क आहे. त्याच भूमिकेतून कार्यकर्त्यांनी आपली नाराजी कळवली असून पुढील काळात बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईलं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Uddhav Thackeray & Sharad Pawar
Ajit Pawar News : दमानियांनी भेट घेतल्यानंतर अजितदादांची मोठी प्रतिक्रिया; आमदार धसांनाही 'या' एकाच शब्दात फटकारलं

याबाबतच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी पार्लमेंट सेशन दरम्यान याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच दौंड बारामती, इंदापूर आणि पुरंदरमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत खासदार संजय राऊत यांची उपस्थितीत बैठक लावण्यात येईल. असा आश्वासन संजय राऊत यांनी दिल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com