
Pune News : मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर रविवारी पार पडले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या शिबिरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये वसंत मोरे (Vasant More) यांना देखील "मी शिवसेनेत का आलो" या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली होती. याबाबतचे पत्र आमदार सुनील राऊत यांनी पूर्वीच मोरे यांना पाठवले होते. त्यानुसार तयारी करून वसंत मोरे यांनी जोरदार भाषण केले.
या कार्यक्रमा दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पुण्यातील ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांची महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात भेट झाली. ही भेट खासदार संजय राऊत यांनी घडवून आणली होती. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, वसंत मोरे आणि संजय राऊत एवढेच जण त्या ठिकाणी उपस्थित होते.
त्यावेळी उद्धव ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यातील झालेल्या चर्चेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरातून टिपला आणि त्यानंतर तो त्यांनी वसंत मोरे यांना पाठवला. त्यानंतर हा व्हिडिओ वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. संजय राऊत यांचा आपल्यावर किती प्रेम आहे. हे देखील आपल्या पोस्ट माध्यमातून वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणाले, 'एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम कसे आणि किती करावं हे फक्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबांकडून शिकावं... त्याचे झाले असे निर्धार मेळाव्यात असताना अचानक उद्धवसाहेब जिकडे बसले होते तिकडे मला बोलावण्यात आले. होय मी नगरसेवक होणार, या मुलाखतींची फाईल दाखवू लागलो. अचानक सगळा विषय पुढे आल्यामुळे कोण फोटो किंवा व्हिडिओ काढतय याकडे लक्ष नव्हते, कारण आतमध्ये फक्त चारजण होतो. पण अश्यावेळी माझा कोणी व्हिडिओ बनवला असेल, असे वाटले ही नव्हते. अचानक परतीच्या मार्गावर असताना राऊत साहेबांचा मेसेज आला अन् पाहतो तर काय हा व्हिडिओ खुद्द खासदार संजय राऊतसाहेब यांनी बनवला होता.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.