
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने 237 जागा जिंकत घवघवीत यश संपादन केले आहे. तर दुसरीकडे केवळ 37 जागी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा सामन्यात विरोधकांचा आवाज गेल्या 30 ते 35 वर्षात पहिल्यांदाच इतका कमी झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अनेक वर्ष विरोधकांची संख्या कमी राहत होती. पण सरकारच्या विरोधात आक्रमकपणे विरोधक आवाज उठवत तर एखाद्या प्रश्नावरून घेरण्याची संधी आल्यास आक्रमकपणे तुटून पडत सरकारला 'सळो की पळो' करून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे होती, अशी परिस्थिती आज तर दिसत नाही.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्यानंतरही दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारची कोंडी करण्याची संधी चालून आली होती. या राजीनाम्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले होते. मात्र, असे असताना विरोधकांनी सभागृहात अथवा सभागृहाबाहेर विरोधकांनी कुठचे आवाज उठवला नाही. त्यामुळे ही संधी हातची गेली.
अधिवेशनाचा पहिला आठवडा उलटला असून सध्या तरी विरोधक बॅकफुटवरच दिसत आहेत. दुसरीकडे सत्ताधाऱ्यानी मुंडेंच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करीत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून सभागृह डोक्यावर घेत अबू आझमीचे निलंबन करण्यास भाग पाडले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच फार्मात दिसले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी पक्ष बिनधास्त होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी विधिमंडळात नाहीतर विधान भवनाच्या परिसरात प्रसार माध्यामासमोर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून आणि मी तो स्वीकारला असल्याचे सांगून टाकले. मात्र, सभागृहात त्यांनी माहितीच दिली नाही. विरोधकाने या राजीनाम्यानंतर तीन दिवसांनी विधानसभेत आवाज उठवला पण त्यात कुठेच आक्रमकपण दिसला नाही. धनंजय मुंडेनी राजीनामा का दिला ? त्याच्याविषयी संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका काय? हे कळणे गरजेचे असताना ते विचारण्याचे धाडस विरोधी पक्षाने केले नाही.
सभागृहात सुरुवातीला होत असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणानंतर पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान अनेकदा विरोधकाकडून धक्कादायक गोष्टी बाहेर काढल्या जातात. गेल्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात महायुतीचे सरकार राज्यात अस्तित्वात होते. त्यावेळचे काही घोटाळे सभागृहासमोर आणत वातावरण तापविण्याची संधी विरोधकांकडे होती पण सत्ताधारी पक्षावर प्रहार करण्याची ताकद कुठेच दिसली नाही. विरोधी पक्षाकडे आक्रमकपणाच शिल्लक राहिलेला नाही. विरोधक बॅकफूटवर तर बिनधास्त सत्ताधारी असे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील विधानसभेतील चित्र होते.
दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषा व मुंबेबत केलेल्या विधानामुळे विधान परिषदेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यांनी कामकाज बंद पडले पण विधानसभेत विरोधक आक्रमक दिसले नाहीत. कदाचित महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पदाचे वेध लागले असल्याचे कारण यामागे नव्हते ना अशी चर्चा होऊ लागली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
बीडमधील घटनांच्या निमित्ताने विरोधकांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अशा मुद्द्यावरून राज्य सरकारची कोंडी करायला हवी होती. काही दिवस विरोधी पक्षाकडून त्या मुद्द्यावर सभागृहाबाहेर राज्य सरकारवर टीका करताना दिसत होते. मात्र, विरोधकांनी विधानसभेत कसलाच आवाज उठवला नाही. विधानसभेत विरोधक कुठे गायब होतात हा प्रश्न सर्वानाच सतावत आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामध्ये सत्ताधारी मंडळी विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळणार का? यावरून राज्य सरकारची कोंडी करण्याची संधी चालून आली आहे. त्यावर तरी आक्रमक होणार का? त्याचे उत्तर आता दुसऱ्या आठवड्यात मिळेल? अशी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.