Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे-पाटील पुणे पोलिस आयुक्तपदी?

Vishwas Nangare Patil Pune Police Commissioner : शिंदे गटाच्या नेत्याच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण...
Vishwas Nangare Patil
Vishwas Nangare PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी असलेले विश्वास नांगरे-पाटील हे पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाचा आदेश येण्यापूर्वीच नांगरे-पाटील यांच्याबाबत व्हॉट्सअप स्टेटस पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्ष शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने याबाबत एक स्टेटस ठेवलं आहे. अशी बातमी साम टीव्ही या वृत्तवाहिनेनं दिली आहे. (Latest Marathi News)

Vishwas Nangare Patil
Ahmednagar Politics : नगरमध्ये 776 रस्त्यांचा भ्रष्टाचार; काँग्रेसच्या नेत्याने घेतली विश्वास नांगरे पाटलांची मुंबईत भेट

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या या स्टेटसमुळे आता विश्वास नांगरे-पाटील पुण्याचे नवे पोलिस आयुक्त होणार की काय? अशी चर्चा होत आहे. कारण गृहमंत्रालयाच्या आदेशापूर्वीच नांगरे-पाटलांच्या या नव्या पदाबाबत सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं स्टेटस ठेवलं आहे. पुणे पोलिस आयुक्त कोण होणार, याची चर्चा सुरू होती. या स्टेटसमुळे आता पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे.

Vishwas Nangare Patil
Pune Police News : वर्षानुवर्षे सूचना देऊनही पुणे पोलिस फारसे गंभीर नाहीत !

विद्यमान पुणे शहर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी नुकचंच १०० पेक्षा जास्त गुन्हेगार टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. रितेशकुमार यांचा कार्यकाळ काही महिने शिल्लक असतानासुद्धा नांगरे-पाटलांची पुण्याच्या आयुक्तपदी चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्याचे आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे

पुणे आणि मुंबई पोलिस दलाच्या आयुक्तपदी अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. पुणे, मुंबई पोलिस दलातील आयुक्तपद भूषविल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली जाते. त्यामुळे पुणे आणि मुंबई पोलिस दलाचे आयुक्तपद भूषविणे ही पोलीस दलात मोठी बाब मानली जाते.

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा असली तरी सेवाज्येष्ठता विचारात घेतल्यास नांगरे-पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता तशी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांगरे-पाटील विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असून, सध्या ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com