Shivjayanti At Lal Killa: ठरलं तर..! एकनाथ शिंदे लाल किल्ल्यावरील शिवजयंतीला जाणारचं...

यंदा पहिल्यांदाच आग्र्यातील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
Shivjayanti At Lal Killa
Shivjayanti At Lal Killa Sarkarnama
Published on
Updated on

Shivjayanti At Lal Killa : शिवजयंती उत्सवासाठी पहिल्यांदाच शिवजन्मस्थळी शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येणार असल्याचे निश्चित होत असताना आग्र्यातील लाल किल्ल्यावरही शिवजयंती (Shivjayanti) पहिल्यांदाच साजरी केली जात असल्याने मुख्यमंत्री शिंदे शिवनेरीहून थेट आग्र्याला जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयात तसा निर्णय झाला असून आज मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही या माहितीला दुजोरा दिला. (Eknath Shinde would go to Shiva Jayanti at Lal Fort)

आग्र्यातील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचा मार्ग दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आजच मोकळा झालाय. महाराष्ट्र सरकार जर सहआयोजक होत असेल तर या जयंती उत्सवाला परवानगी देण्यात कुठलीही हरकत नाही, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Shivjayanti At Lal Killa
Rohit Pawar : सोलापूर लोकसभेच्या जागेवरुन रोहित पवार प्रणिती शिंदेंना म्हणाले.."आपापसात वाद.."

औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या निर्णयासाठी दिल्ली उच्च न्यायालयात शिवप्रेमी म्हणून मांडलेली भक्कम बाजुमुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा थेट आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याला परवानगी मिळालेली आहे. अर्थात सहआयोजन म्हणून महाराष्ट्र सरकारनेही तत्वत: मान्यता दिल्याने आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होताना तिथे आता सहआयोजक असलेल्या महाराष्ट्र सरकारचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे हजर राहण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होते. मुख्यमंत्र्यांशी त्यांची काही वेळ भेट झाली तर त्यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशीही शिरुर लोकसभा मतदार संघातील काही कामांचे संदर्भात चर्चा झाली. याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या आग्रा दौ-याबाबत निर्णय झाल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com