Ladki Bahin Yojana : महिला सांगताहेत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना CM शिंदेंनीच आणली, शंभूराज देसाईंचा दावा

Shambhuraj Desai On Mukhyamantri Ladki Bahin Yojana : "नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा चुकून फक्त लाडकी बहीण योजना असं म्हटलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असा करतात."
Shambhuraj Desai, Eknath Shinde
Shambhuraj Desai, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 13 Sep : लाडकी बहीण योजना नव्हे तर 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना', असा उल्लेख करत जा. महायुतीतले सगळे पक्ष आता या योजनेचा उल्लेख करताना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असाच करतात, असा सल्ला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिला.

शंभूराज देसाई पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी लाडकी बहीण योजने संदर्भात प्रश्न विचारताना केवळ 'लाडकी बहीण योजना' असा उल्लेख करताच देसाई म्हणाले, "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणा. तुम्हीही सरकारी नाव जे आहे तेच घेत जा."

शिवाय यावेळी त्यांनी ही योजना कोणी आणली? असं महिलांना विचारलं तर त्या स्पष्टपणे सांगत आहेत की, ही योजना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आणली, त्यामुळे महिलांमध्ये शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकराने ही योजना आणल्याचं नक्की असल्याचं त्यांनी सांगितलं.

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Dharmarao Baba Atram : एका लेकीने वडिलांना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले होते; धर्मरावबाबांचे काय होणार?

शंभूराज देसाई म्हणाले, "कालपासून इतर लोकही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' हे नाव घ्यायला लागले आहेत. नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा चुकून फक्त लाडकी बहीण योजना असं म्हटलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असा करत आहेत.

Shambhuraj Desai, Eknath Shinde
Hasan Mushrif : आधी रक्तपाताची भाषा आता हसन मुश्रीफांचा शब्द, पण...

दोन दिवस मी मतदारसंघातल्या पंधरा-वीस गावांमध्ये काही महिलांना या योजनेसंदर्भात भेटलो. महिलांना विचारलं ही योजना कुणी आणली? तर त्या स्पष्टपणे सांगत आहेत की, एकनाथ शिंदेंनी आणली. त्यामुळे ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती (Mahayuti) सरकारनं आणल्याचं महिलांमध्ये नक्की आहे." दरम्यान, यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केल्याचंही सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com