Maratha Reservation News : ..तर पुढचे आंदोलन जड जाईल ; का दिला जरांगेंनी इशारा ?

Manoj Jarange warned in Ambajogai: मायबाप मानलेल्या समाजाशी गद्दारी होणार नाही..
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

-प्रशांत बर्दापूरकर

Maratha Reservation News : आमच्या सभेला लाखो लोक आपल्या लेकरांच्या वेदना घेऊन येत आहेत. त्या वेदना समजून घेत सरकारने मराठा समाजाचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. जर सरकारने याकडे गांभीर्याने न पाहता एकट्या छगन भुजबळ याच्या सांगण्यावरुन काही निर्णय घेतला तर अवघड होईल. मग सरकारला आमचे पुढचे आंदोलन जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकाराला दिला आहे.

तर मी समाजालाच मायबाप मानले आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करणार नाही. मी मरायला घाबरत नाही. मला गोरगरीब मराठ्यांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळाल्यानंतरच हसू पाहायचं असल्याचेही त्यांनी सांगितले. बीड Beed जिल्ह्यात अंबाजोगाई Ambajogai तालुक्यातील अंबा कारखाना येथे सोमवारी रात्री मनोज जरांगे Manoj Jarange यांची सभा झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे यांनी खुर्चीवर बसूनच भाषण केले.

Manoj Jarange
Nagpur Winter Session : आडबाले, वंजारींनी पुन्हा रेटली जुन्या पेन्शनची मागणी

यावेळी ते म्हणाले, छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांची नियत चांगली नाही, सरकारने त्यांना समज द्यावी. गावागावात मराठा ओबीसी एकत्र राहावेत अशीच आमची इच्छा आहे. वेळ आली तर छगन भुजबळ यांना जशास तसे उत्तर देऊ, त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही प्रत्येक सभेत शांततेचे आवाहन करतोय. आताही तीच विनंती आहे. गोंधळात आयुष्य जाऊ देऊ नका, दूरदृष्टी ठेवा.

आरडाओरडा करून समाजाचे वाटोळे करू नका असे आम्ही समजला सांगतोय. आणि भुजबळ प्रत्येक ठिकाणी जातीय तेढ निर्माण करीत आहेत असेही जरांगे म्हणाले. आरक्षणामुळे गोरगरीब मराठ्यांचे कल्याण होणार आहे. आम्ही ७० वर्षांपासून आरक्षणाची वाट बघितली आहे. हे आरक्षण तेव्हाच मिळालं असत. तर आज मराठे जगाच्या पाठीवर प्रगत झाले असते. मात्र आता षडयंत्र चालणार नाही.

समाजाच्या जीवावरच मी आरक्षणासाठी जीवाची बाजी लावीत आहे. सध्या शरीर साथ देत नाही, मात्र ही आरामाची वेळ नाही. विजयाचा क्षण जवळ आला आहे. त्यामुळे आता आराम नाही. मी मरायला घाबरत नाही. मला समाजाला आरक्षण मिळवूनच द्यायचे आहे. त्यामुळे आता आपली एकजूट मोडू देऊ नका. मराठा पुढाऱ्यांना विनंती आहे की यात राजकारण आणू नका. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जीव धरणीला टेकला तरी आरक्षणाचा लढा सोडणार नाही असा निर्धारही जरांगे यांनी स्पष्ट केला. आपल्या लेकरांना पुन्हा अशी संधी येणार नाही. आपल्या लेकरांचे वाटोळे होत आहे. लेकरांना अधिकारी करण्याचं गोरगरिबांच स्वप्न अर्धवट आहे. त्यासाठी मायबाप रात्रंदिवस कष्ट करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आता आरक्षण मिळालेच पाहिजे. आपल्या लाखो लेकरांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे नेत्यांना जातीपेक्षा मोठे मानू नका. जातच संपली तर आपल्याला कोणी विचारणार नाही. जात वाचली पाहिजे यासाठी जागृती करा असे देखील जरांगे यांनी सांगितले.

( Edited by Amol Sutar )

Manoj Jarange
Pankaja On Parli Constituency : परळी मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे विधान; ‘मला अन्‌ धनंजयला...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com