PMC News : पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा अचानक कामावर बोलावलं! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पक्षनेते व समिती कार्यालयात कामासाठी पुन्हा बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू असून यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
Pune Municipal Corporation building where discussions have started after some retired employees were reportedly called back to assist in offices of party leaders and committees following civic elections.
Pune Municipal Corporation building where discussions have started after some retired employees were reportedly called back to assist in offices of party leaders and committees following civic elections. Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अनेक अधिकारी, कर्मचारी पुन्हा महापालिकेतही येत नाहीत. मात्र, महापालिकेची निवडणूक होऊन पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हातात कारभार गेल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांना ‘विशेष’ कामगिरीवर पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. महापालिकेचे अर्थकारण चालणाऱ्या स्थायी समितीसह पक्षनेत्यांच्या कार्यालयात याच कर्मचाऱ्यांची चलती आहे.

दरम्यान, नगरसचिव विभागाकडून आम्ही अशी कोणतीही नियुक्ती केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापालिका भवनात नगरसेवकांची, कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून बंद असलेले महापौर कार्यालयासह सभागृहनेते, स्थायी समिती, विविध पक्षाच्या गटनेत्यांची कार्यालये सुरु झाली आहेत.

या ठिकाणी संबंधित पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते त्यांची कामे करून घेण्यासाठी पत्र तयार करून घेणे, निवेदन देणे अशी कामे करून घेतात. या ठिकाणी कामे करण्यासाठी नगरसचिव विभागाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. सध्या 38 जणांपैकी 27 जण या विविध कार्यालयात कार्यरत आहेत.

Pune Municipal Corporation building where discussions have started after some retired employees were reportedly called back to assist in offices of party leaders and committees following civic elections.
Pune crime : विद्येच्या माहेरघरात रक्ताचा सडा! कॉलेजच्या उंबरठ्यावरच विद्यार्थिनीवर कोयत्याने सपासप वार; पुण्यात नक्की चाललंय काय?

एकीकडे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी नियुक्त केलेले असताना दुसरीकडे विशेष कामगिरी पार पाडण्यात तरबेज असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलविण्यात आले आहे. त्यांना संबंधित नेत्यांकडून पगार दिला जात आहे. पण या प्रकारामुळे (PMC) महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची संधी हिसकावली जात आहे. स्थायी समितीच्या कार्यालयात हिशोब ठेवण्यात हुशार असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला जबाबदारी देण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation building where discussions have started after some retired employees were reportedly called back to assist in offices of party leaders and committees following civic elections.
Pune Congress : पुणे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : बड्या नेत्यावर तिकीट विक्री अन् जमीन हडपल्याचा आरोप: थेट राहुल गांधींना लिहिलं पत्र

सभागृहनेता कार्यालयात दोन कर्मचारी नियुक्त केले असून, त्यांच्याकडून कार्यालयाचे व्यवस्थापन पाहिले जात आहे. तसेच विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस गटनेते यांच्याही कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एखाद दुसरा कर्मचारी कार्यरत होता, पण आता त्यांचीच संख्या वाढत चालल्याने कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांमध्येही हा चर्चेचा विषय झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com