Assembly Session 2025 : पवारांच्या आमदारावर राहुल नार्वेकरांनी दिली मोठी जबाबदारी; सोलापुरातील दोन आमदारांना मिळाला बहुमान

Abhijeet Patil-Samadhan Autade News : माढा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेले अभिजीत पाटील यांची विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
Abhijeet Patil-Samadhan Autade
Abhijeet Patil-Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 30 June : माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले अभिजीत पाटील यांच्या खांद्यावर विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहेत. प्रथमच आमदार झालेल्या पाटील यांच्यासाठी तो बहुमान असणार आहे. आमदार पाटील यांच्यासोबतच पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्यावरही दुसऱ्यांदा ही जबाबदारी आली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (monsoon Session) आजपासून (ता. ३० जून) मुंबईत सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये अमित साटम, किशोरअप्पा पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजीत पाटील, समीर कुणावार, समाधान आवताडे या आमदारांचा समावेश आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेले अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांची विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीस दोन अडीच वर्षांचा कालावधी असतानाच शरद पवारांनी अभिजीत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

Abhijeet Patil-Samadhan Autade
Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदर हॉस्पिटलमधील ‘त्या’ व्यक्तीला दोनवेळा केला होता फोन!

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ते भाजपसोबत गेले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाऊन माढ्यातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. ते सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांचा पराभव करून निवडून आले आहेत.

आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेले अभिजीत पाटील यांच्यावर सरकारकडून विशेषतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर मोठा विश्वास दाखविण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Abhijeet Patil-Samadhan Autade
BJP Politics : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने निवडली टीम, किरीट सोमय्यांचाही समावेश! आशिष शेलारांकडे नेतृत्व!

आवताडेंना दुसऱ्यांदा संधी

अभिजीत पाटील यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आमदार समाधान आवताडे यांचीही तालिकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. समाधान आवताडे हे भाजपच्या चिन्हावर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तालिकाध्यक्ष म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांना तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com