Ramraje Wins Legal Battle: रामराजेंनी अखेर करून दाखवलंच! रणजितसिंहांना धोबीपछाड देत कोर्टातून हटवला 'श्रीराम'वरील प्रशासक

Ramraje vs Ranjitsingh Court Case: विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी यातून रणजितसिह यांच्यावर कुरघोडी केल्याचे दिसून येत आहे. राजे गटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan Political News : फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासकाची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी यातून रणजितसिह यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे. हायकोर्टाच्या निकालामुळे राजे गटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

श्रीराम कारखाना 20 वर्षाहून अधिक काळ रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात आहे. कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. अशातच श्रीराम कारखान्याबाबत माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी उच्च न्यायालयात मतदार यादीबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेतील हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याची निवडणूक सहकार मंत्रालयाने पुढे ढकलली होती.

Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Students Politics: पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याआधीच नामकरणावरून वाद पेटला! विद्यार्थी संघटना भिडल्या!

श्रीराम कारखान्याने सादर केलेल्या मतदार याद्यांचे प्रारूप हे सहकार कायदा व उपविधीप्रमाणे तयार न करता निवडणूक अधिकारी यांना सादर केले आहे. त्यावर हरकती घेऊनही या मतदार याद्या दुरुस्त न करता सदोष मतदार याद्या केल्याने ही निवडणूक कायदेशीर व पारदर्शी होणार नाही. त्यामुळे प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती.

याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत शासनाने साखर प्रादेशिक सहसंचालकांना आदेश दिले होते. त्यानुसार, सर्व परिस्थितीचा अभ्यास करून, कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतदार यादीबाबत तक्रार आहे.

याबाबत याचिकाही दाखल झाली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात होणारी निवडणूक ही निःपक्ष व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती गरजेची आहे, असे निरीक्षण नोंदवले होते.

त्यानंतर प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसा त्यांनी कार्यभारही स्वीकारला होता. पण सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल दाखल केले होते. चुकीच्या पद्धतीने प्रशासक नेमल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Ramraje Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात नव्या व्यक्तीची एन्ट्री; आरोपी चाटे आणि केदारच्या जबाबात धक्कायदायक माहिती

उच्च न्यायालयाने निकाल देताना कारखाना संचालक मंडळाची बाजू योग्य असल्याने सांगितले. तसेच राज्य सरकारने नेमलेला प्रशासक उच्च हटविला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजे गटामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता प्रशासक नियुक्ती रद्द केल्याने आता कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com