Bal Thackeray Jayanti : सरदार तयार करणारे बाळासाहेब !

Vijay Shivtare : विजय शिवतारेंनी सांगितल्या बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी
Vijay Shivtare with Balasaheb Thackeray
Vijay Shivtare with Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thackeray Birth Anniversary News in Marathi : राजकारणात 1999 मध्ये आलो असलो तरी 1986 पासूनचे दिवगंत बाळासाहेब ठाकरेंचे एकही भाषण चुकवले नाही. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा आदर होताच. त्यांना भेटल्यानंतर तो द्विगुणीत झाला. 2004 मध्ये पुंरदरमधून विधानसभा लढवण्याचे ठरवले होते. त्यासाठी थेट बाळासाहेबांची भेट घेतली.

पहिल्या भेटीतच त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला तो शेवटपर्यंत. त्यांच्या विचारधनामुळेच सलग दोनदा आमदार झालो. आमदार झाल्यानंतर बाळासाहेब मला 'पुरंदरचा सरदार' म्हणाले, अशी आठवण माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितली. हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त 'सरकारनामा'शी बोलताना शिवतारेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

Vijay Shivtare with Balasaheb Thackeray
Bal Thackeray Birth Anniversary: भुईमुगाच्या शेंगा अन् 'दोराबजी'बिर्याणीवर बाळासाहेब ताव मारायचे!

बाळासाहेबांशी पहिली भेट

मुंबईतील राजकारणात 1999 पासून काम करत होतो. 2004 मध्ये पुरंदरची सेवा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार कामाला लागलो होतो, मात्र मागे खंबीर पाठिंब्याची गरज होती. त्यातूनच शिवसेनेचे नेते अनिल देसाईंची भेट घेतली. ते मला थेट बाळासाहेबांकडेच घेऊन गेले.

आजपर्यंत ज्यांच्या विचाराने भारावून गेलो होतो, त्यांच्यासमोरच उभा असल्याने क्षणभर विश्वास बसला नव्हता. त्या पहिल्या भेटीत त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. तसेच दगडावर डोके आपटतोय, असे म्हणत धोक्यांची जाणीवही करून दिली. मात्र निवडणुकीत त्यांचे विचार आणि पाठबळावरच आमदार झालो. त्यांनी टाकलेला विश्वास शेवटपर्यंत सार्थ ठरवला.

Vijay Shivtare with Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Birthday: बाराव्या वर्षी घेतला बाळासाहेबांकडून गुरूमंत्र!

शिवसेनेचा प्रवास सांगितला

आमदार झाल्यानंतर एक दीड वर्षांनी त्यांनी मला फोन करून मातोश्रीवर बोलावून घेतले. संध्याकाळी मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो. त्यावेळी त्यांनी माझ्याशी शिवसेना स्थापनेपासून सर्व प्रवास सांगितला.

पक्षवाढीसाठी घेतलेल्या कष्टांची माहिती दिली. निवडणुका कशा जिंकल्या, त्यासाठी रणनीती कशी आखली याबाबतही ते बोलले. शिवसेनेचा इतिहास बाळासाहेबांच्याच तोंडून ऐकण्याचे भाग्य मला लाभले. मी एकमेव असा आमदार असेल की ज्याच्याशी बाळासाहेबांनी दोन तासांहून अधिक वेळ घालवला. यातूनच आमच्यातील नाते घट्ट झाल्याचेही शिवतारेंनी स्पष्ट केले.

Vijay Shivtare with Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Jayanti 2024: आई तुळजाभवानीवरील नितांत श्रद्धा पण अधुरे राहिलेलं बाळासाहेबांचं 'ते' स्वप्नं!

पुरंदरचा सरदार

बाळासाहेब आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घट्ट मैत्री होती. बाळासाहेब त्यांना सरदार म्हणत. एक दिवस गप्पा मारता मारता माझ्यासमोरच बाळासाहेबांनी बाबासाहेब पुरंदरेंना फोन केला. त्यावेळी ते म्हणाले, 'अरे सरदार कुठेय तू ?' असे ते पहिल्यांदा बोलले. नंतर म्हणाले, 'आता तू कसला सरदार... आता पुरंदरचा सरदार माझा आहे. तो सरदार माझ्या समोर बसला आहे.' त्यावर पुरंदरे म्हणाले, की विजय शिवतारे आहेत का ? यानंतर मलाही बाळासाहेब सरदार म्हणत होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा जिंकल्यानंतर त्यांना अतिव आनंद झाला होता, असे सांगताना विजय शिवतारे भावूक झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांचे कुतूहल

बाळासाहेब राज्यातील विविध भागातील लोकांशी चर्चा करून तेथील राजकारण, समाजकारण, संस्कृती जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करत. दरम्यान, पुरंदरच्या निवडणुकीदरम्यान, चुकीच्या पद्धतीने पैसे वाटणाऱ्या लोकांना एरंडाच्या काठीचा प्रसाद दिला होता. याबाबत त्यांना माहिती दिली होती. हे ऐकून त्यांनी मला एरंडाची काठी आणायला सांगितली. तसेच मला त्यांच्याकडे असलेली लंडन पोलिसांच्या दंडुक्याचीही माहिती दिली. शिवसेनेचे अनेक नेते झाले, आमदार, खासदार झाले, पण त्यांनी माझ्याशी भरभरून गप्पा मारल्या, असेही शिवतरेंनी आवर्जून सांगितले.

शेवटपर्यंत साथ

बाळासाहेबांनी माझ्यावर वडिलांसारखे प्रेम केले. मीही त्यांच्या शब्दाबाहेर नव्हतो. याच प्रेमातून की काय मला त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहता आले. बाळासाहेबांचे निर्वाण झाले, त्यावेळी त्यांचे पार्थिव मातोश्रीबाहेर आणले गेले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला मी खांदा दिला होता. आमच्यातील प्रेमामुळेच मला त्यांच्या पार्थिवाला खांदा देता आला, हे मी माझे भाग्य समजतो.

Vijay Shivtare with Balasaheb Thackeray
Uddhav Thackeray : भगवा कुर्ता, रुद्राक्षांची माळ; ठाकरेंनी नव्या लुकमधून विरोधकांना काय दिला मेसेज ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com