Kunal Kamra Breaking : शिवसैनिकांच्या धमक्यांनी कुणाल कामरा धास्तावला; मद्रास हायकोर्टाकडे केली मोठी मागणी

Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याने हजर रहावे यासाठी मुंबई पोलिसांनी त्याला समन्सही बजावला आहे.
Kunal Kamra |Eknath Shinde
Kunal Kamra |Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याने हजर रहावे यासाठी मुंबई पोलिसांनी समन्सही बजावला आहे. यावर त्याने आठवड्याभराची मुदत मागून घेतली आहे. याचदरम्यान, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

"मी विल्लुपुरम (तामिळनाडू) चा आहे. मी मुंबईत परत गेलो तर मुंबई पोलिस अटक करतील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे." असे म्हणत कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयातून ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मागितला आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीसाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी दुपारची वेळ दिली आहे.

Kunal Kamra |Eknath Shinde
Kunal Kamra Case News : कुणाल कामराला टेरर फंडिंग? राहुल कनाल यांच्या पोस्टने खळबळ

एका कॉमेडी शोमध्ये कुणाल कामरा याने गत आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणे गायले. त्यांच्या बंडावर आधारित हे गाणे होते. यात त्यांची दाढी, गुवाहटी, गद्दार अशा शब्दाचा उल्लेख होता. गाणे व्हायरल होताच शिवसैनिक आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी शो शूट झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर कामरावर खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याप्रकरणी त्याला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आले आहे.

Kunal Kamra |Eknath Shinde
Shivsena vs Kunal Kamra : मंत्री महोदय म्हणतात, थर्ड डिग्री देणार, टायरमध्ये घालून मारणार! नाव घेऊन टीका केली असती तर?

मी धमक्यांना घाबरत नाही

शिवसैनिकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी केली आहे. पण त्याने माफी मागण्यास नकार दिला आहे. राजकारण्यांची खिल्ली उडवणे गुन्हा नसल्याचे त्याने सोशल मीडियावर म्हटलं आहे. तपास यंत्रणा, कोर्टाला सहकार्य करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. मी धमक्यांना घाबरत नाही असे त्याने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com