Praniti Shinde Mangalvedha Tour : वयोवृद्ध महिलेने गाडी अडवत प्रणिती शिंदेंपुढे मांडली व्यथा; ‘गावात प्यायला पाणी नाय; पण दारू भरपूर हाय...’

Lok Sabha Election 2024 : शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे सभा होती. ती सभा संपवून त्या दौऱ्यातील पुढच्या गावाकडे निघाल्या होत्या. तेवढ्यात गावातील वयोवृद्ध महिला गवळाबाई सवईसर्जे यांनी प्रणिती शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडविला.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

महेश पाटील

Solapur, 02 April : सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आज (ता. २ एप्रिल) मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सलगर बुद्रुक येथील सभा आटोपून परत जात असताना गावातील वयोवृद्ध महिला गवळाबाई सवईसर्जे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा ताफा अडवला. ‘गावात प्यायला पाणी मिळत नाय; पण दारू मात्र भरपूर मिळते, आम्हाला पाणी हवंय,’ अशा शब्दांत आपली व्यथा मांडली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) मैदानात उतरल्या आहेत. आमदार राम सातपुते यांच्याशी त्यांची लढत होत आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी सुरू केली आहे. मागील प्रचाराच्या वेळी आमदार प्रणिती शिंदे यांना मंगळवेढ्यातील (Mangalvedha) लोकांनी पाण्याच्या प्रश्नावरून धारेवर धरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde
Solapur Lok Sabha Constituency : दुसऱ्यांच्या मतदारसंघात नाक खुपसण्याचे काम मी करत नाही; प्रणिती शिंदेंचा विरोधकांना टोला

तत्पूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेवरून आक्रमक झालेल्या तालुक्यातील २४ गावांतील शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याची परवानगी मागितली होती. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीची वेळही त्यांना मिळाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घाईघाईने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. त्यामुळे मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न (Water Issue) संवेदनशील बनत चालला आहे.

ऐन उन्हाळ्यात निवडणुका आल्याने आणि गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मतदार पुढाऱ्यांना अडवून पाण्याबाबत विचारणा करत आहेत. तसाच प्रकार आज मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदे यांना अनुभवावा लागला. शिंदे यांची मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे सभा होती. ती सभा संपवून त्या दौऱ्यातील पुढच्या गावाकडे निघाल्या होत्या. तेवढ्यात गावातील वयोवृद्ध महिला गवळाबाई सवईसर्जे यांनी प्रणिती शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडविला.

Praniti Shinde
Solapur Loksabha 2024 : फडणवीस, सातपुतेंची अडचण वाढणार?; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

आमच्या गावात प्यायला पाणी नाही, पण गावात दारू भरपूर मिळते, आम्हाला पाणी हवंय , अशी व्यथा आमदार प्रणिती शिंदे यांच्यापुढे गवळाबाईंनी मांडली. त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘आपण निवडून आल्यावर तुमचे सगळे प्रश्न सोडवू’ असे आश्वासन दिले. त्यानंतर जाताना त्यांनी ‘वाह रे मोदी तेरा खेल; सस्ती दारू मेहॅंगा तेल’ अशी घोषणा देताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

R

Praniti Shinde
Hatkanangle Lok Sabha Constituency : धैर्यशील माने-राजू शेट्टी यांच्या लढतीत ‘वंचित’ची उडी; ठाकरे गटाचा सस्पेन्स कायम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com