Kolhapur Politics : बंटी-मुश्रीफांची राज्यात कुस्ती अन्‌ कोल्हापुरात दोस्ती...

Hasan Mushrif-Satej Patil Friendship : राज्यात एकमेकांच्या विरोधात असले तरी सहकारात या जोडीने दबदबा कायम ठेवला आहे.
Hasan Mushrif-Satej Patil
Hasan Mushrif-Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर दोन गट एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. त्याचपद्धतीने पूर्वी एकत्र राहिलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही मित्र एकमेकांना भिडत आहेत. मात्र, कोल्हापुरातील दोन राजकीय मित्रांची जोडी राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापूरचे राजकारण या जोडीने ढवळून काढले आहे. (Hasan Mushrif-Satej Patil's friendship continues even after transfer of power)

लोकसभा निवडणुकीपासून सध्या सुरू असलेल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) निवडणुकीपर्यंत या जोडीने एकमेकांची साथ सोडलेली नाही. राज्यात एकमेकांच्या विरोधात असले तरी सहकारात या जोडीने दबदबा कायम ठेवला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी आपला दोस्ताना कायम ठेवला आहे. अगदी काल परवा मुश्रीफ यांनी सतेज पाटील हे आमचे भरत आहेत, असे सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif-Satej Patil
Congress Leader Will join Shivsena : मिरजेत काँग्रेसला धक्का; विधानसभा लढलेले नेते ठाकरे गटात प्रवेश करणार

भाजप-शिवसेनेच्या युती सरकारमध्ये गेल्यानंतरही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकाराच्या राजकारणात कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवली आहे. राज्यात उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सत्तेत असले तरी बिद्रीच्या राजकारणात हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. बिद्री कारखान्याची निवडणुकीची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर टाकून आपला दोस्ताना कायम ठेवला आहे.

Hasan Mushrif-Satej Patil
Bharat Bhalke Death Anniversary : भारत भालके...सिर्फ नाम ही काफी है; मृत्यूच्या तीन वर्षांनंतरही मतदारसंघात क्रेझ कायम!

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे ‘गोकुळ’मधून वेगळे होतील, अशी चर्चा होती. पण त्याला छेद देत ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेत आम्ही दोघे सहकारात एकत्र राहणार असल्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली. या दोन उदाहरणांमुळे सहकारात बंटी आणि मुश्रीफ यांनी आपली मैत्री कायम असल्याचे जिल्ह्याला दाखवून दिले आहे.

सध्या बिद्री कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे. एक डिसेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पण, केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ हे समाचार घेताना दिसत आहेत. एका बाजूने मुश्रीफ, तर दुसऱ्या बाजूने आमदार सतेज पाटील हे कारखान्याचा पट गाजवताना दिसत आहेत.

Hasan Mushrif-Satej Patil
Sanjay Raut : “तुम्ही बेकायदा सरकारचे रक्षक आहात”, राऊतांची नार्वेकरांवर आगपाखड

मागील लोकसभा निवडणुकीपासून या जोडीने सहकारातील किल्ले हस्तगत करायला सुरुवात केली. गोकुळ दूध संघ, कोल्हापूर उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर जिल्हा बँकेची एकहाती सत्ता मिळवण्यात हे दोघेही यशस्वी झाले आहेत. शिवाय आता बिद्रीच्या राजकारणातही एकत्र असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी आपण जिवाचे रान करू, असे सांगत असले तरी बिद्रीच्या राजकारणामुळे आगामी लोकसभेची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Hasan Mushrif-Satej Patil
Sachin Pilot : काँग्रेसचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायलटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com