Prajakta Mali Vs Suresh Dhas : ‘मी प्राजक्ता माळींची माफी मागणार नाही’ म्हणत सुरेश धसांनी ‘त्या’ प्रेस कॉन्फरन्सवरच संशय घेतला

Santosh Deshmukh Murder Case : प्राजक्ता माळी यांचे बीड जिल्ह्यातील कोणाशी तरी मैत्रीचे संबंध असावेत. त्यातून त्यांनी हे आजचं प्रकरणं केलेलं असावं.
Prajakta Mali-Suresh Dhas
Prajakta Mali-Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Beed, 28 December : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मी माफी वैगेरे काही मागणार नाही. त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी पुन्हा एकदा माझं स्टेटमेंट पाहावं आणि आपला गैरसमज दूर करावा. राजकारणात कोणाची तरी कोंडी झालेली आहे. ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही क्लृप्त्या लढवल्या जाऊ शकतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा, यासाठी केलेली ही प्रेस कॉन्फरन्स होती, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी थेट प्राजक्ता माळी हिच्या प्रेस कॉन्फरन्सवरच संशय व्यक्त केला.

भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी इव्हेंट मॅनेजमेंटच्या संदर्भाने बोलताना प्राजक्ता माळी हिचा उल्लेख केला हेाता. त्यावरून प्राजक्ता माळी हिने आज पत्रकार परिषद घेत धस यांचा निषेध केला होता. त्यावर बोलताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिची पत्रकार परिषद म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फोकस डायव्हर्ट करण्यासाठी केलेला प्रकार आहे, असे विधान केले आहे.

सुरेश धस म्हणाले, भाषणात मी कुठेही घसरलो नाही. प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) यांनी माझे स्टेंटमेंट पुन्हा एकदा पाहावं. त्यावेळी मी आक्षेपार्ह मी काहीही बोललो नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येपासून विषय डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. इथून पुढे मला तुम्ही प्राजक्ता माळीसंदर्भात प्रश्न विचारू नका. माझ्याठायी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे.

प्राजक्ता माळींचा गैरसमज झालेला असेल तर त्यांनी पुन्हा एकदा माझं स्टेटमेंट पाहावं आणि आपला गैरसमज दूर करावा. राजकारणात त्यांना खेचण्याचा काही संबंध नाही. त्या काही माझ्या दुश्मन नाहीत. माझी आणि त्यांची पुरेशी ओळखही नाही. मी त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहत असतो. त्यांनी जर माझा निषेध केला असेल तर मीही त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम बघायचं बंद करतो, असा इशाराही त्यांनी दिला.

Prajakta Mali-Suresh Dhas
Suresh Dhas : पंकूताई...आमची स्वाभिमानी औलाद, तुमच्यापुढं जी हुजूर करणार नाही; सुरेश धस यांचे मुंडेंना चॅलेंज (Video)

ते म्हणाले, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मी माफी वैगेरे काही मागणार नाही. माध्यमांना माझी विनंती आहे की, संतोष देशमुख प्रकरण दुसरीकडे नेऊ नका. माणूस आमचं गेलं आहे. ज्याचं जळतं, त्यालाच कळतं. हे कशाला आता विषय, तो सोडून द्या आता.

प्राजक्ता माळींच्या माध्यमातून संतोष देशमुख प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्लॅन दिसत आहे. ते कोण करत असेल. प्राजक्ता माळी यांचे बीड जिल्ह्यातील कोणाशी तरी मैत्रीचे संबंध असावेत. त्यातून त्यांनी हे आजचं प्रकरणं केलेलं असावं. माझी प्राजक्ता माळींना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही तुमच्या विधानावर ठाम राहा, असा सूचक इशाराही धस यांनी दिला.

सुरेश धस म्हणाले, प्राजक्ता माळी भावूक झाल्या तरी माझं मत आजही ठाम आहे. त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांना मुंबईत जाऊन भेटेन. तुमचं हे चुकीचं आहे, ताई. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते घेतले आहे. मी बोलले पुन्हा एकादा काढून पाहतो. त्यात जर काही चुकीचं बोललो असेल तर...

Prajakta Mali-Suresh Dhas
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख खून प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप; ‘फरारी तीन आरोपींचा मर्डर..?’ (Video)

राजकारणात कोणाची तरी कोंडी झालेली आहे. ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही क्लृप्त्या लढवल्या जाऊ शकतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा, यासाठी केलेली ही प्रेस कॉन्फरन्स होती, असा दावाही सुरेश धस यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com