

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी जून महिन्यात मोठी संधी निर्माण झाली आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या विभागांमध्ये मिळून 46,500 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे, बँकिंग, संरक्षण दल, कर्मचारी निवड आयोग तसेच राज्य सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रकिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (UPSSSC) लोअर पीसीएस अंतर्गत 2,516 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून 2026 आहे.
कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षेसाठी 12,256 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार 22 जून 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
रेल्वे भरती मंडळाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी 11,127 जागांची भरती जाहीर केली आहे. 10वी उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रातील ITI किंवा डिप्लोमा धारक उमेदवारांना अर्जाची संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2026 आहे.
राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने संगणक प्रशिक्षक पदांसाठी 3,951 जागा उपलब्ध केल्या आहेत. संगणक विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना 23 जून 2026 पर्यंत अर्ज करता येईल.
संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा (CDS-II) अंतर्गत 451 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. अर्जाची अंतिम तारीख 9 जून 2026 आहे.
याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA-II) आणि नौदल अकादमीसाठी 394 पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 9 जून 2026 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.
भारतीय हवाई दलातील AFCAT 02/2026 अंतर्गत फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये 379 पदांसाठी अर्ज सुरू आहेत. या भरतीसाठी 19 जून 2026 पर्यंत अर्ज करता येईल.
बँकिंग क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7,150 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू असून बँक ऑफ बडोदामध्ये 5,000 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. दोन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2026 आहे.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी या सर्व भरती महत्त्वाच्या ठरणार आहेत. अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया लवकर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.