Lok Sabha Election 2024 : मुंबईत मराठी टक्का ठरणार प्रभावी, राजकीय पक्षांकडून 'व्होट बँके'साठी मोर्चेबांधणी

Mumbai Marathi People : मुंबईतील मराठी माणूस गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत मुंबई बाहेर फेकला गेला आहे.
mumbai loksabha election
mumbai loksabha election sarkarnama

- विष्णू सोनवणे

Mumbai, 3 May : मुंबई मराठी टक्का अजूनही प्रभावी असल्यानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) निर्णायक भूमिका घेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मराठी व्होट बँकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईमधील सहाही मतदारसंघात सुमारे 29 टक्के मराठी मतदार आहेत. पण, हा मराठी टक्का विविध राजकीय पक्षांत विभागला गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि महायुतीचं ( Mahayuti ) राजकीय भवितव्य मराठी टक्का ठरविणार आहे.

मुंबईतील मराठी माणूस गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत मुंबई बाहेर फेकला गेला. ही वस्तुस्थिती असली, तरी सहाही लोकसभा मतदारसंघात अजूनही मराठी माणूस टिकून असून संसदीय राजकारणासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यामुळे विविध राजकीय पक्षांतील मराठी नगरसेवकर, आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांचा पाया मराठी माणूस आहे, तर भाजप आणि काँग्रेस पक्ष या पक्षांना वाढविण्यासाठी मराठी माणसांची भूमिका आजवर महत्त्वाची ठरली आहे. अन्य लहान पक्षही याच मतांच्या बळावर राजकारण करीत आहेत. या लोकसभा निवडणुकीतही मराठी टक्का निर्णायक ठरणार असून ही व्होट बँक मिळविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईशान्य मुंबई हा सर्वाधिक मराठी मतदारांची संख्या असलेला मतदारसंघ. मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर हा पूर्व उपगनराचा बहुतांश भाग मराठी पट्टा आहे. उत्तर पश्चिम भागातही गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी या भागात मराठी टक्का मोठ्या प्रमाणात आहे. उत्तर मुंबईतही मागाठाणे, बोरिवली, गोराई, चारकोप येथे मराठी माणसांच्या मोठ्या वसाहती आहेत. दक्षिण मुंबईत वरळी, शिवडी, भायखळा, गिरगाव या भागात मराठी मतदारांचे प्राबल्य आहे. दक्षिण मध्य मुंबईत चेंबूर, वडाळा, माहीम या भागात मराठी मतदार आहेत. या सर्वच मतदारसघांत झोपडपट्ट्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. मराठी मतदार मुंबईत विविध वसाहतींमध्ये विखुरला आहेत. त्यामुळं यंदा 29 टक्के मराठी मतदार काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठी उमेदवार -

दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिंदे गट), अनिल देसाई (ठाकरे गट)

दक्षिण मुंबई : अरविंद सावंत (ठाकरे गट), यामिनी जाधव (शिंदे गट)

उत्तर मध्य : उज्ज्वल निकम (भाजप), वर्षा गायकवाड (काँग्रेस)

उत्तर पश्चिम : रवींद्र वायकर (शिंदे गट), अमोल कीर्तिकर (ठाकरे)

उत्तर पूर्व : भूषण पाटील आणि संजय पाटील

mumbai loksabha election
Lok Sabha Election News : राज्यातील 'या' चौदा मतदारसंघातून जाणार पहिल्यांदाच नवा चेहरा लोकसभेत!

अन्य उमेदवार -

उत्तर मुंबई : भाजपचे पियूष गोयल

उत्तर पूर्व : मिहीर कोटेचा

आमदार आणि माजी नगरसेवकांवर मदार

मराठी आमदार आणि माजी नगरसेवकांना सध्या सर्व मतदारसघांची जबाबदारी दिली आहे. मराठी पॉकेटमधून अधिकाधिक मतदान होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे मराठी मतांची विभागणी होणार आहे.

मराठी मतदार -

उत्तर मध्य - 2,81,863

दक्षिण मुंबई - 3,78,549

दक्षिण मध्य - 2,76,731

उत्तर मुंबई - 3,42,691

उत्तर पश्चिम - 3,62,074

उत्तर पूर्व - 4,64,984

मुंबईतील सहा लोकसभा मतदारांची संख्या - ( 74,36,383 )


( Edited By : Akshay Sabale )

mumbai loksabha election
Lok Sabha Election 2024 : दिघे-शिंदेंचे विश्वासू भिडणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी महापौर झुंजणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com