Lok Sabha Election 2024 : दिघे-शिंदेंचे विश्वासू भिडणार; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी महापौर झुंजणार

Rajan Vichar Vs Naresh Mhaske : 4 जून रोजी ठाण्याचा 'ठाणेदार' म्हणून कोण 'राज'न करणार की कोण 'नरेश' ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल.
anand dighe rajan vichare naresh mhaske eknath shinde
anand dighe rajan vichare naresh mhaske eknath shindesarkarnama

Thane News, 1 May : महायुतीच्या जागावाटपात ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडं राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना यश आलं आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के ( Naresh mhaske ) यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्याचे 'ठाणेदार' होण्यासाठी आता दोन माजी महापौर एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. 2014 मध्ये दोन माजी महापौर आमने-सामने निवडणूक रिंगणात उतरले होते. यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमाविण्यासाठी एक दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे ( Anand Dighe ) यांचा, तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासू आहे. त्यामुळे येत्या 4 जून रोजी ठाण्याचा 'ठाणेदार' म्हणून कोण 'राज'न करणार की कोण 'नरेश' ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. पण, ही लढत ठाकरे विरुद्ध शिंदे, अशीच रंगणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election 2024 ) वारे वाहण्यास सुरुवात झाल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजप, शिंदे सेना किंवा अजित पवार गट यांनी आपापला दावा दाखल केला. मात्र, भाजप आणि शिंदे सेना शेवटच्या क्षणापर्यंत आपापल्या दाव्यावर ठाम होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होतात की नाही, अशी चर्चा रंगली होती. ठाणे मतदारसंघ भाजपकडे शतशहा जाणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. तितक्याच ताकदीनं भाजपनं मतदारसंघात घेण्यासाठी जोर लावला होता. यामुळे भाजप आणि शिंदे सेनेतील तिढा सुटत नव्हता. पण, तो सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना यश आलं असून ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि ठाणे, अशा दोन जागा आपल्याकडं खेचून आणल्या आहेत. याठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात मत टाकणार हे पाहवं लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिघे यांनी खेचून आणलेला मतदारसंघ कोण राखणार?

सन 1989 आणि 1991 असे सलग दोनवेळा रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेना दिवंगत आनंद दिघे यांनी 1996 साली भाजपकडून अक्षरशः खेचून आणला. त्यानंतर झालेल्या आतापर्यंत निवडणूकीत एकदा हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. तो म्हणजे 2009 साली डॉ. संजीव नाईक खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर दोन वेळा तो मतदारसंघ राखण्यात शिवसेनेला यश आले. यामध्ये 1996 ते 2004 असे चार वेळा दिवंगत प्रकाश परांजपे खासदार झाले, तर 2008 साली आनंद परांजपे खासदार झाले होते. पण, यंदा ठाकरे आणि शिंदे या दोन सेनेमध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत दिघे यांचे शिष्य तर दुसरीकडे शिंदे यांचे निष्ठावंत आमनेसामने आहेत. त्यामुळे ही बाजी कोण मारणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोण आहेत नरेश म्हस्के?

म्हस्के हे मुख्यमंत्री शिंदे यांचे निष्ठावंत शिल्लेदार आहे. ते दोन वेळा स्विकृत सदस्य म्हणून पालिकेत गेले होते. त्यानंतर 2012 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदावरही त्यांनी काम केलं. परंतु, 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर पक्षाला त्यांची दखल घ्यावीच लागली. भाजपाला दिलेले आश्वासन मोडत शिवसेनेनं म्हस्केंना स्थायी समितीचे सभापतीपद दिलं. आता 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले आणि पुन्हा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत सभागृह नेते पद त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी महापौरपदाची धुराही सांभाळली. शिवसेना फुटीनंतर ते शिंदे यांच्याबरोबरीने बाहेर पडले.

anand dighe rajan vichare naresh mhaske eknath shinde
Lok Sabha Election 2024 : सोलापूर अन् माढा मतदारसंघांत पक्ष बदलाची प्रक्रिया थांबता थांबेना

कोण आहेत राजन विचारे?

विचारे हे दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्य असून ते निष्ठावान शिवसैनिक आहेत. 1992 ते 2012 या काळात 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून सभागृह नेतेपद, स्थायी समिती सभापती ही पदे भूषवली आहेत. त्यातच ते ठाणे महापौर झाल्यानंतर आमदार म्हणूनही निवडून आले. 2014 साली लोकसभा लढवून ते खासदार झाले, यंदा ते तिसऱ्यांदा खासदारकी लढवत आहेत. पहिल्या वेळी ते 2 लाख 81 हजार मताधिक्यांनी विजयी झाले. दुसऱ्या वेळी 4 लाख 12 हजार 145 मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला.

यापूर्वीही झाली दोन माजी महापौरांमध्ये लढत

यंदा ठाण्याच्या दोन महापौरांमध्ये ठाणे लोकसभेच्या खासदारकी यासाठी लढत होत आहे. 2014 च्या निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी ठाणे आणि नवीमुंबई या महापालिकेच्या माजी महापौर राज विचारे विरुद्ध संजीव नाईक, अशी लढत झाली होती. तेव्हा विचारेंनी संजीव नाईक यांचा पराभव केला होता.

( Edited By : Akshay Sabale )

anand dighe rajan vichare naresh mhaske eknath shinde
Lok Sabha Election News : 'ईडी'चे दार ते लोकसभेचं मैदान..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com