Lok Sabha Election Result : राज्यातून एक दोन नव्हे तर तब्बल 29 खासदार पहिल्यांदाच पाहणार लोकसभेचे द्वार !

Lok Sabha Election News : मंगळवारी मतमोजणी पार पडली आणि सर्व चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये राज्यातून जवळपास 29 नवीन चेहरे पहिल्यांदा लोकसभेत जाणार आहेत.
Nilesh lanke, Praniti shinde, Pratibha dhanorkar
Nilesh lanke, Praniti shinde, Pratibha dhanorkar Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी चाललेला रणसंग्राम जवळपास अडीच महिन्याचा कालावधीनंतर संपला आहे. मंगळवारी मतमोजणी पार पडली आणि सर्व चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये राज्यातून जवळपास 29 नवीन चेहरे पहिल्यांदा लोकसभेत जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देताना भाजपने पाच विद्यमान खासदार तर शिवसेना शिंदे गटाने चार जणांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून एक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक अशा अकरा खासदारांना डच्चू देण्यात आला. तर दोन खासदारांचे निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या अशा एकूण 13 जागांवरून त्यासोबतच काही खासदारांना पराभव स्वीकारावा लागल्याने त्याठिकाणावरून 16 नवीन असे एकूण 29 चेहरे लोकसभेत गेले आहेत. (Lok Sabha Election Result)

रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजू पारवे विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत झाली. त्यामधल्या नवख्या असणाऱ्या श्यामकुमार बर्वे यांनी बाजी मारली. हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम विरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे आमने-सामने उभे ठाकले होते. त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांनी बाजी मारली. जळगावमध्ये भाजपचे उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली. त्यामध्ये स्मिता वाघ यांनी विजय मिळवला.

अकोलामधून भाजपने अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे (Congress) अभय पाटील लढत झाली. त्यामध्ये अनुप धोत्रेंनी बाजी मारली. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर व शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर यांना निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामध्ये वायकर अल्पशा मताने विजयी झाले.

Nilesh lanke, Praniti shinde, Pratibha dhanorkar
Shrikant Shinde News : दिल्लीत श्रीकांत शिंदेंना मिळणार 'ही' मानाची खुर्ची

चंद्रपूरमध्ये भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर अशी लढत झाली. त्या धानोरकर विजय झाल्या. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते या विद्यमान आमदारांत लढत झाली. त्यामध्ये प्रणिती शिंदे विजयी झाल्या. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार वर्षा गायकवाड निवडणूक रिंगणात उतरलाय होत्या. वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. पुण्यात भाजपकडून (Bjp) मुरलीधर मोहोळ तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर अशी लढत झाली त्यामध्ये मोहोळ यांनी विजयी झाले ही मंडळी पहिल्यांदा लोकसभेत जाणार आहेत.

त्याशिवाय छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, शरद पवार गटाचे बीडमधून बजरंग सोनवणे, माढामधून धैर्यशील पाटील, नगरमधून नीलेश लंके, दिंडोरीतून भास्कर भगरे, भिवंडीतून सुरेश म्हात्रे, वर्धा अमर काळे,

Nilesh lanke, Praniti shinde, Pratibha dhanorkar
Beed Loksabha Election Result : बीडमध्ये 'हा' फॅक्टर चालला अन् मोदींच्या सभेनंतर पराभवाची हॅट्‌ट्रीकही झाली!

पालघरमधून भाजपचे हेमंत सावरा, ठाकरे गटाचे यवतमाळ - वाशिममधून संजय देशमुख, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के, सांगलीतून अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले आहेत.

काँग्रेसचे नवे चेहरे

अमरावतीमधून बळवंत वानखेडे, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमुरमधून नामदेव किरसान, लातूरमधून शिवाजी काळंगे, नांदेडमधून वसंत चव्हाण, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, धुळेमधून शोभा बच्छाव, जालन्यातून कल्याण काळे, कोल्हापूरमधून शाहू महाराज हे विजयी झाले. ही सर्व मंडळी संसदेत पहिल्यांदा संसदेत पोहचणार असल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे.

Nilesh lanke, Praniti shinde, Pratibha dhanorkar
Jalna Loksabh Constituency : मतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर? दानवे की काळे?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com