Beed Loksabha Election Result : बीडमध्ये 'हा' फॅक्टर चालला अन् मोदींच्या सभेनंतर पराभवाची हॅट्‌ट्रीकही झाली!

Pankaja Munde Vs Bajrang Sonwane : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आणि उमेदवाराचा पराभव असे समीकरण सलग तिसऱ्यांदा योगायोगाने घडून आले आहे.
Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Narendra Modi Sabha For Pankaja MundeSarkarnama

Beed News : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन, आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या आणि जरांगेंच्या आवाहनाला जिल्ह्यात मिळालेल्या प्रतिसादाचे लोकसभा निवडणुकीच्या निकालात प्रतिबिंब दिसले. तर, पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींची सभा आणि उमेदवाराचा पराभव होण्याचा तिसऱ्यांदा योगायोग घडला आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचे पडसाद आणि प्रतिसाद जिल्ह्यात कायम सर्वाधिक राहिला. त्यांनी अंतिम इशारा आंदोलनाची अंतिम सभाही जिल्ह्यात घेतली होती. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालात जरांगे फॅक्टर चालल्याचे दिसले. समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे त्यांनी जाहीर आवाहन केले असले तरी त्यांनी कधीही पंकजा मुंडे यांचे नाव घेतले नव्हते. पंकजा मुंडेंनी त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसादही उमटले होते.

दरम्यान, मतमोजणीच्या आदल्या दिवशी त्यांनी जरांगेंचा परिणाम झाला का याबाबत निकालानंतर बोलू असे सांगितले होते. मात्र, मनोज जरांगे यांच्यामुळे समाज एकवटल्याचे आणि मतदानात वाढ झाल्याचे मतमोजणीवरुन दिसते. वंचितने 50 हजार, 18 मुस्लिम उमेदवारांनी 29 हजार तसेच बमपाच्या अशोक थोरात यांना 54 हजारांवर मते मिळूनही पंकजा मुंडेंचा पराभव झाला.

तर, मागच्या वेळी ताकदवान (त्यावेळच्या राष्ट्रवादी) पक्षाकडून उमेदवार असूनही प्रितम मुंडे यांच्या विरोधात तब्बल 1 लाख 68 हजार मतांनी पराभूत झालेले बजरंग सोनवणे यावेळी साडे सहा हजार मतांनी विजयी होण्यात मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा वाटा असल्याचे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आणि उमेदवाराचा पराभव असे समीकरण सलग तिसऱ्यांदा योगायोगाने घडून आले आहे. सर्वप्रथम 2014 ला पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात आले होते. त्यावेळी लोकसभेचीही पोटनिवडणूक होती.

मात्र, राष्ट्रवादीने प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. नरेंद्र मोदींनी बीडमध्ये प्रचार सभा घेतली होती. शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे बीडमधून राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात लढत होते.

Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Bajrang Sonwane Win : पवारसाहेबांच्या 'बजरंगा'ची कमाल ! पंकजा मुंडेंचा निसटता पराभव; सोनवणे विजयी

जिल्ह्यात भाजपचे सहापैकी पाच आमदार विजयी झाले. तर, मोदींनी सभा घेतलेल्या बीडमधले एकमेव दिवंगत मेटे पराभूत झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा परळीत झाली होती. त्यावेळीही त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. आताही जिल्ह्यात तगड्या नेत्यांची फौज आणि खुद्द पंकजा मुंडे मोठ्या नेत्या असताना नरेंद्र मोदींनी सभा घेतली आणि त्यांचा पराभव झाला. योगायोगाने मोदींनी जिल्ह्यात आतापर्यंत तीन सभा घेतल्या आणि त्यांनी सभा घेतलेले उमेदवार पराभूत होण्याचा योगायोग घडला.

(Edited By Deepak Kulkarni)

Narendra Modi Sabha For Pankaja Munde
Jalna Lok Sabha Election : 'रावसाहेब दानवेंचा अहंकार जनता नक्की उतरवणार'; काँग्रेस उमेदवार काळेंची टीका!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com