Loksabha Election Results : टेन्शन वाढलं! महायुतीचे 9 आमदार डेंजर झोनमध्ये

Nashik Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis : शिवसेनेत पाडण्यात आलेली फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बंडखोरी हे मुद्दे भाजपच्या विरोधात गेल्याचे दिसून आले.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavissarkarnama

Loksabha Election Results : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्याची संबंधित तिन्ही जागा गमावल्या. हा फटका केवळ लोकसभेला बसलेला नाही. लोकसभा मतदारसंघातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे चित्र आहे.

राज्यात गतवर्षी घडलेल्या विविध राजकीय घडामोडींमध्ये भाजपने सत्ता काबीज केली. मात्र ज्या पद्धतीने सत्ता मिळवली त्यामुळे जनतेच्या मनातील स्थान मात्र गमावले. शिवसेनेत Shivsena पाडण्यात आलेली फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील बंडखोरी हे मुद्दे भाजपच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसला आहे. आताही ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

सध्या जिल्ह्यातील 15 पैकी 13 आमदार राज्यातील महायुतीच्या सत्तेचे घटक आहेत. त्यांचा जेवढा गाजावाजा होतो त्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत त्यांना मते मिळू शकली नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (नाशिक), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे (दिंडोरी) आणि काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव (धुळे) विजयी झाल्या या तीन उमेदवारांना नाशिक मधील 15 पैकी नऊ विधानसभा मतदारसंघात आघाडी आहे.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दिल्लीच्या भेटीनंतर आत्मविश्वास वाढला, 'पळणारा नाही, लढणारा', देवेंद्र फडणवीस कडाडले

नाशिक लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या सीमा हिरे आणि राहुल ढिकले या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघात महायुतीला लक्षणीय आघाडी मिळाली. मात्र अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे (सिन्नर), सरोज अहिरे (देवळाली) आणि भाजपच्या देवयानी फरांदे (नाशिक मध्य) या तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीची मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे या आमदारांना हा धोक्याचा इशाराच आहे.

दिंडोरी मतदारसंघात भाजपचे डॉ. राहुल आहेर आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांनी आपला मतदारसंघ टिकवून ठेवला. मंत्री छगन भुजबळ, नितीन पवार, दिलीप बनकर आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चार आमदारांना मोठा धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांना मोठी आघाडी मिळालेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महायुती सावध झाली आहे. त्याचा मोठा परिणाम घटक पक्षांच्या जागा वाटपावर होईल. त्याचा अभ्यास आणि तयारी लगेचच सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सत्ताधारी नऊ आमदारांचे झोप उडाली आहे.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis
Sanjay Jadhav Meet Manoj Jarange : ठाकरेंच्या खासदाराने घेतली मनोज जरांगेंची भेट.. उपोषणाला पाठिंबा, आरक्षण लढ्यात सक्रिय राहण्याचा दिला शब्द...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com