Maharashtra Politic's : नाना पटोलेंना अजूनही महाविकास आघाडी सरकार असल्याचा भास होतोय; कारणही सांगितले...

Nana Patole Statement : महायुती सरकारने मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी महायुती म्हणण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने चुकीचा पायंडा पाडला आहे, असे म्हटले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 07 July : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी चर्चेला सुरुवात करताना ‘मी या पुरवणी मागण्यांना विरोध करण्यासाठी उभा आहे,’ असे स्पष्ट केले. महायुती सरकारने मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी महायुती म्हणण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने चुकीचा पायंडा पाडला आहे,’ असे म्हटले. त्यावर स्पष्टीकरण देताना मला महाविकास आघाडी सरकारचा भास होतो, हे सांगताना त्याचे कारणही सांगितले.

नाना पटोले (Nana Patole) यांनी, ‘मी 2025-26 या वर्षातील पुरवण्या मागण्याला विरोध करण्यासाठी उभा आहे,’असे सांगितले. एक नवीनच पायंडा या महाविकास....पटोले बोलत असताना महायुती सरकार म्हणण्याऐवजी महाविकास असं म्हणून गेले.’

समोरच्या बाकावर बसलेल्या सत्ताधारी आमदारांंनी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एक नवीन पायंडा पाडला आहे, असे विधान केले. त्यावर स्पष्टीकरण देताना पटोले म्हणाले, काय झालंय की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. त्यांना समोर पाहिले की, मला महाविकास आघाडी सरकारचा भास होतो, असेही पटोले यांनी म्हटलं आहे.

वास्तविक, महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. पण त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांशी चर्चा न करताच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारच्या अधःपतनाला सुरुवात झाल्याचे म्हणणे आहे.

Nana Patole
Nana Patole : ‘आमचा विरोध ‘ए गॅंग’ला आहे’; नाना पटोलेंनी विधानसभेत कोणाला ‘ए गॅंग’ म्हटलं?

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत उभी फूट पाडून सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते, त्या वेळी विधानसभा अध्यक्ष असते तर टप्प्याटप्याने गेलेल्या आमदारांवर कारवाई झाली असती, असा अनेकांचा होरा आहे. पण सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचे अध्यक्ष नसणे, ही गोष्ट तत्कालीन विरोधकांच्या पथ्यावर पडली होती, हे दिसून आले आहे.

Nana Patole
Assembly Session : भुजबळांच्या माध्यमातून पटोलेंचा अजितदादांवर निशाणा; ‘उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातील ‘ती’ बैठक कोणत्या दलालासाठी ऐनवेळी रद्द केली?’

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे नगरनियोजन मंत्री होते. विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले यांना त्या वेळी सरकारमध्ये मंत्री होण्याची आस लागली होती, अशीही चर्चा त्यावेळी होती. मात्र, नानांचे मंत्रिपदाचे स्वप्न एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अधुरेच राहिले आहे. आता त्याच नाना पटोले यांना महाविकास आघाडीचे सरकार असल्याचा भास होत आहे. त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com