मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर नारायण राणेंची छाप!

Eknath Shinde|Uddhav Thackeray : तुम्ही आयुष्यात कुणाला चापट तरी मारली का?
Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. 'शिवतीर्था'वर शिवसेनेचा तर बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा काल मुंबईत पार पडला. या मेळाव्यांमध्ये दोन्ही बाजूने एकमेकांवर कठोर शब्दात टीकेचे बाण सोडले गेले.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाचा उल्लेख 'गद्दार' असाच केला. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या कालच्या भाषणात चांगलेच आक्रमक झाले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नेहमी संयमाने तोलून-मापून बोलणारे शिंदे काल मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या शैलीत बोलत असल्याचे काही वेळा जाणवले. (Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News)

Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
उद्धव ठाकरेंची 'ती' टीका मुख्यमंत्री शिंदेंच्या जिव्हारी; भाषण करताना पाराच चढला...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्था'वर भाषण करताना बंडखोरी केलेल्या आमदारांवर शरसंधान साधले. आज तुमच्याजवळ मंत्रिपद आहेत. मात्र आयुष्यभर गद्दारीचा शिक्का माथ्यावर मारून फिरावे लागणार,अशा शब्दात त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. याचबरोबर महाविकास आघाडी का स्थापन केली याचेही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, भाजपला धडा शिकवण्यासाठीच मी हा निर्णय घेतला. काय हा माझा निर्णय चुकीचा होता का?, असा सवालही त्यानी उपस्थितांना केला. याचबरोबर मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असचं ठरलं होतं, असेही त्यांनी पुन्हा यावेळी सांगितले.

ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी स्थापन झाली आणि शपथविधी झाली तेव्हा पहिल्या सातमध्ये शिंदे देखील होते तेव्हा तुम्ही का नाही बोललात? असा सवालही त्यांनी केला. शिवाय यांचा हावरटपणा एव्हढा की, बाप मंत्री, कार्टं खासदार आणि आता नातवालाही नगरसेवक करा त्याला शाळेत तर जाऊ द्या आधी, अशा शब्दात त्यांनी शिंदेवर टीका केली.

Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
अजित पवारांनी बारामती शहर राष्ट्रवादीची सूत्रे दिली तरुण नेत्याच्या हाती!

दुसरीकडे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंही भाषण करत होते. त्यावेळी ठाकरेंनी केलेल्या टीकेची चिठ्ठी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि शिंदेंचा पारा चांगलाच चढला. त्यांनी त्यावेळी ठाकरेंनी केलेल्या टीकेचा ओळीने समाचार घ्यायला सुरूवात केली.

आपण शिवसेनेसाठी केलेला संघर्ष आणि त्याग मोठा आहे. हे करत असताना आपल्या अंगावर पडलेल्या शेकडो केसेसची आठवणही त्यांनी ठाकरेंना करून दिली. त्याबरोबर राणे ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंवर टीका करतात त्याचप्रकारे टीका करताना तुम्ही आयुष्यात कुणाला चापट तरी मारली का? आपल्याला मुख्यमंत्री पदाची लालसा होती, मोठे होणाऱ्यांची तुम्ही पाय कापले. याचबरोबर आनंद दिघे यांचा मृत्यूनंतर ठाकरे यांनी त्यांच्या संपत्तीबाबत विचारणा केल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. याचबरोबर तुम्हाला आपल्या वडिलांचे विचार विकायला लाज वाटली नाही का?, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंना सवाल विचारला.

Narayan Rane, Eknath Shinde Latest Marathi News
‘शिंदेसाहेब, मंत्रिमंडळात तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बसायचा, तेव्हा हा आरोप केला नाही’

दरम्यान, एकनाथ शिंदे हे बंड केल्यावर इतर आमदार खासदारांप्रमाणे कठोर शब्दात टीका करणं टाळात संयमाने टीका करत होते. मात्र, काल ठाकरेंच्या भाषणातील टीका ऐकल्यावर त्यांचा पारा चांगलाच चढला. जसे की, उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यावर नारायण राणे ज्याप्रकारे पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या प्रश्नांचे वाचन करून त्यांच्यावर टीका करतात. त्याचप्रकारे काल शिंदेंनी देखील त्यांच्यासारखेच माझ्याकडे अनेक गुपित आहेत, ते पुन्हा कधीतरी बाहेर काढणार,असा त्यांच्याप्रमाणे इशाराही दिला. यामुळे शिंदेंच्या कालच्या भाषणात राणेंची छाप दिसून आल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com