India Vs Pakistan: ...होय 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये नष्ट केलेले ते हेच 'मुरिदके'; जे कसाबच्या तोंडून बाहेर पडलेले!

Operation Sindoor : ....होय हेच ते 'मुरिदके'. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जी कंबरेत लाथ घातली, त्यात हेच 'मुरिदके' नष्ट आणि 'आयएसआय'चा 'आका' मौलाना मसूद अझरचे दहा कुटुंबिय ठार झाले.
India Vs Pakistan | Operation Sindoor
India Vs Pakistan | Operation SindoorSarkarnama
Published on
Updated on

राजस्थानच्या बिकानेर येथे रेल्वेच्या पायाभूत विकासाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा दहशतवाद आणि पाकिस्तानवर थेट हल्ला चढवला. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा.. असं त्यांनी ठणकावून सांगितलं. याचवेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) का दिमाग थंडा होता है, लेकिन लहू गरम है. मोदी के शरीर में लहू नही गरम सिंदूर बहता हैं.. असं स्पष्ट करत मोदींनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाने म्हणजेच पाकिस्तानच्या 'आयएसआय' ने दहा प्रशिक्षित अतिरिकी पाठवले होते. त्यापैकी एक जण मुंबईच्या विनोली चौपाटीवर शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या शौर्यामुळे जिवंत पकडला गेला. याच कसाबच्या तोंडून पुढे तपासात बाहेर पडले नांव 'मुरिदके'.

काश्मीरमधील पहलगाम या सुंदर पर्यटनस्थळी गेलेल्या पर्यटकांची पाकिस्तानी अतिरेक्यांनी म्हणजेच पाकिस्तानने हत्या केली. त्याला भारताने चोख उत्तर देत पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील 9 अतिरिकी तळ उध्वस्त करत 100 हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला..

मुंबईवर झाले 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार मौलाना मसूद अझर गेली काही वर्षे डरकाळ्या फोडत होता. त्याच्या डरकाळ्या म्याव म्यावमध्ये कधी बदलल्या हे त्याचे त्यालाच समजले नसेल.

....होय हेच ते 'मुरिदके'. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जी कंबरेत लाथ घातली, त्यात हेच 'मुरिदके' नष्ट आणि 'आयएसआय'चा 'आका' मौलाना मसूद अझरचे दहा कुटुंबिय ठार झाले. 27/11 च्या मध्यरात्री कसाब मुंबई पोलीसांच्या क्राइम ब्रँचच्या ताब्यात आला. त्यानंतर या संपूर्ण गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल होईपर्यंत म्हणजेच पुढील 90 दिवसांच्या कालावधीत बहुसंख्य काळ कसाब पोलीसांच्या ताब्यातच होता.

India Vs Pakistan | Operation Sindoor
Beed Police: संतोष देशमुख हत्येनं हादरलेल्या बीडमधून मोठी बातमी; एका रात्रीत तब्बल 606 पोलिसांच्या बदल्या, नवनीत काँवत यांचा दणका

याच कालावधीत कसाबने आपल्याला कबुलीजबाब देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार याबाबतच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून 20 मे 2009 रोजी मुंबईच्या तत्कालीन मुख्य महानगर दंडाधिकारी श्रीमती सावंत वाघुले, यांच्या न्यायालयात कसाबचा कबुली जबाब नोंदवण्यात आला. पुढे कसाबचा हा जबाब त्यावेळचे विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी स्वीकारण्यास नकार दिला असला तरी, पाकिस्तानची (Pakistan) अतिरेकी भरती, त्यांचे प्रशिक्षण यावर हा कबूलीजबाब चांगलाच प्रकाश टाकतो.

केवळ कसाबचा कबुलीजबाबच नव्हे, तर 26/11 या विषयावर दोन ब्रिटिश पत्रकार अँड्रियन लेव्ही आणि कॅथी स्काॅट क्लार्क यांनी 'द सीज' हे पुस्तक लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. या पुस्तकातही पाकिस्तानच्या या प्रशिक्षण तळांवर अक्षरशः 'सर्च -लाईट' टाकण्यात आला आहे.

India Vs Pakistan | Operation Sindoor
Anjali Damania: अंजली दमानियांचा वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठा दावा; 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या 'आयजीं'चं नाव घेत म्हणाल्या....

कसाब आणि इतरांवर जे आरोप ठेवले गेले, त्यातला मुख्य आरोप होते, भारताविरुद्ध युद्ध करण्याचा कट रचणे आणि प्रत्यक्षात युद्ध छेडणे. कसाबने न्यायालयात जो कबुलीजबाब दिला, तो या दोन्ही आरोपांवर प्रकाश टाकणारा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद करून ठेवले आहे. या संपूर्ण कबुली-जबाबात कसाबने आपली पार्श्वभूमी नमूद केली आहेच, शिवाय अतिरेक्यांच्या गोटातला शिरकाव ते प्रत्यक्ष मुंबईपर्यंतचा प्रवास आणि घटना यावरही विस्तृत भाष्य केले आहे.

एक नजर टाकूयात कसाबच्या कबुली-जबाबावर

कसाबचा हा सगळा प्रवास सुरू झाला तो नोव्हेंबर 2007 पासून. घरची गरीबी असलेला कसाब अखेर लहान-मोठे उद्योग करत पोटापाण्याची सोय भागवण्यासाठी रावळपिंडीला नव्यानेच झालेला मित्र मुझफ्फरलाल खान याच्या बरोबर पोहोचला. तिथे त्यांना लष्कर-ए-तय्यबाचे काही सदस्य जमात-उल-दावा या संघटनेच्या नांवाखाली घरोघरी बकऱ्यांच्या कातडीचे दान मागताना दिसले. कसाब आणि त्याच्या मित्राच्या मनात या सदस्यांबद्दल सहानुभूती निर्माण व्हायला लागली.

India Vs Pakistan | Operation Sindoor
Nilesh Chavan : वैष्णवी हगवणेचं बाळ ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण विरोधातही अखेर गुन्हा दाखल!

याच काळात जमात-उल-दावा ने ठिकठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करायला सुरूवात केली. 2002 मध्ये 'लष्कर-ए-तय्यबा' वर बंदी घालण्यात आल्यानंतर जमात-उल-दावा या नावाने काम सुरू करण्यात आल्याचे तिथे त्यांना सांगण्यात आले होते. याच वेळी 'लष्कर-ए-तय्यबा'चे प्रशिक्षण घ्यावे, असा विचार कसाब आणि त्याच्या मित्राच्या मनात सुरू झाला.

अखेर दोघांनीही रावळपिंडीच्या राजा बझार भागातल्या एका मौलवीची भेट घेतली. तिथल्या बंगश काॅलनी भागात हा मौलवीचं कार्यालय होतं. तिथं या दोघांना भेटीचं कारण विचारलं असता, आम्हाला काश्मीरमध्ये 'जिहाद'करायचा आहे, असे त्यांनी सांगितलं. तिथल्या कर्मचार्‍यांनी त्यांचे नांव-गाव-पत्ता टिपून घेतला आणि दुसऱ्या दिवशी सामान- सुमानासह दोघांना यायला सांगितलं.

India Vs Pakistan | Operation Sindoor
Sanjay Rathod: शिवसेनेचे मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत, पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती? फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचा गंभीर आरोप

दुसऱ्या दिवशी दोघं तिथं पोहोचले. तिथल्या एका कर्मचाऱ्यानं त्यांना एका चिठ्ठीवर एक पत्ता लिहून दिला.....हा पत्ता होता...."दौरा-ए-सुफा, मर्कझ-ए-तय्यबा, मुरिदके....."

(क्रमशः)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com