Mahayuti Oath Ceremony : भाजपने शपथविधीसाठी शिवाजी पार्क वगळून आझाद मैदान का निवडले? 'हे' आहे कारण

Mahayuti Oath Ceremony Azad Maidan : युती सरकारचा 1995 ला शिवाजी पार्कवर शपथविधी झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील शिवाजी पार्कवरच मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Oath Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शपथविधी विषयीची माहिती दिली. युती सरकारचा 1995 ला शिवाजी पार्कवर शपथविधी झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा देखील शिवाजी पार्कवर शपथविधी झाला होता. त्यामुळे महायुती सरकार शिवाजी पार्कला शपथविधी का घेत नाहीत याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

शिवाजी पार्कवर शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करत आला नाही. मनोहर जोशी यांनी राजीनामा देत मुख्यमंत्रिपद नारायण राणे यांच्याकडे दिले होते.नारायण राणे यांना देखील आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. सहा महिने आधीच निवडणूका होत. युतीचा पराभव झाला. तर, उद्धव ठाकरे यांचे सरकार अडीच वर्षात पडले. त्यामुळे शिवाजी पार्क हे शपथविधीसाठी अनलकी असल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Ambadas Danve News : 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती', पराभवाने खचू नका!

महायुतीचा शपथविधी पाच डिसेंबरला होत आहे. सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त लाखो भीम अनुयायी चैत्य भूमीला अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्याच्या प्रशासनाकडून आधीच तयारी केली जाते. त्यामुळे देखील सहा डिसेंबरच्या पूर्व संध्येला शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा घेणे शक्य नसल्याने शिवाजी पार्क ऐवजी आझाद मैदान निवडण्यात आल्याच्या चर्चा आहेत.

2014 चा शपथविधी वानखेडेवर

2014 मध्ये युतीला बहुमत मिळाले होते. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा त्यावेळी वानखेडे स्टेडियमवर झाला होता. त्यामुळे भाजपच यंदा देखील वानखेडेवर शपथविधी सोहळा करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Shivsena Vs NCP : शपथविधी आधीच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वाद, अमोल मिटकरी म्हणाले, 'गुलाबराव जुला*** होऊ नका'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com