
Mumbai, 05 January : ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळा संधी मिळाली नाही. मात्र त्यांचे मंत्रिपद कशमुळे हुकले याची खमंग चर्चा आजही राज्याच्या राजकारणात होते. मात्र आपले मंत्रिपद कशामुळे हुकले यांची एक शक्यता खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. कोणीतरी जाऊन माझे तिकिट कापा, असं मी जाहीरपणे बोललो होतो. लोकसभा निवडणूक हरूनही ज्यांना संधी मिळाली, ते असं कधीही बोलले नव्हते, अशी शक्यता मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली.
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला मंत्रिपदाच्या यादीत नाव आहे, असे सांगितले होते. बावनकुळे हे तर शपथविधीच्या दोन दिवस आधी म्हणजे १३ डिसेंबर रोजी रात्री माझ्या घरी पर्णकुटीवर आले होते. आमच्यामध्ये दोन अडीच तास चांगली चर्चा झाली. पंधरा डिसेंंबर रोजी बावनकुळे यांचा सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी बरोबर फोन आला आणि ते म्हणाले ‘आठ वाजून दहा मिनिटांनी अध्यक्षांकडून मंत्रिपदाची यादी आली आहे. त्या यादीत तुमचं नाव नाही.’
मी त्यांना सांगितलं, 'ठीक आहे, काही अडचण नाही. पण, कारण काय'. त्यावर बावनकुळे म्हणाले, ‘कारण माहिती नाही.’ त्यानंतर वीस मिनिटांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलणं झालं. त्या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत जे पराभूत झाले आहेत, ते एक कारण असू शकतं, असं सांगितलं. एवढाच एक विषय झाला. पण, मी त्यांच्याशी या विषयावर काही बोललो नाही. पक्षाला मंत्रिमंडळात मी राहावं, असं वाटत नसेल म्हणून मला संधी मिळू शकलेली नसावी, अशी शक्यताही मुनगंटीवार यांनी बोलून दाखवली.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या काही नेत्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली, हे खरे आहे. पण, ते नेते लोकसभा निवडणूक लढवून पराभूत झाले आहेत. मात्र तुम्ही मात्र निवडणूक लढविण्यासाठीच इच्छूक नव्हते, असा फरक मला देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा सांगितला होता.
राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळात आहेत, त्यांचे चिरंजीव लोकसभेत पराभूत झाले. पंकजा मुंडे यांचाही बीडमध्ये पराभव झाला. मात्र त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. पण त्यांनी कुठेही ‘मला लढायची इच्छा नाही किंवा मला लोकसभा निवडणूक लढायची इच्छा नाही,’ असे जाहीरपणे कधीही म्हटलं नव्हतं. तसं म्हणणारा मी एकमेव होतो, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझी भावना व्यक्त केली होती. ती चूक आहे, असे मला वाटत नाही. मी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी १९७७ मध्ये जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला होता. मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी १९८९ मध्ये लोकसभेला उभं केलं. तेव्हा तर मी कॉलेजचा विद्यार्थी होतो. पण, पक्षाने सांगितले म्हणूनच मी निवडणुकीला उभं राहिलो ना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.