सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.
तर आता जाणून घेऊयात आज दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी रात्री 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज मेळावा...
सर्व पदाधिकाऱ्यांसह आजी माजी नगरसेवक मेळाव्याला लावणार उपस्थिती
बबलू देशमुख हे भाजपचे स्लीपर सेल, अनिस अध्यक्ष श्याम मानव यांची जहरी टीका...बच्चू कडूंच्या मतदारसंघात सभा रद्द झाल्यानं संताप व्यक्त
अनंत अंबानींनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट...वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा...भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
लाडकी बहिण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण महत्त्वाची... महिला सुरक्षेबाबत सरकार अपयशी... ठाकरे गटाचे अनिल परब यांचा सरकारवर हल्लाबोल.,...
भाजपचे उमेदवार ठरवण्यासाठी नवा प्रयोग...उमेदवारांसंदर्भात प्रत्येक पदाधिकाऱ्यांना देणार लिफाफा..पसंतीक्रमानुसार 3 पर्याय लिफाफ्यात लिहिण्याचे आदेश
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 138 कोटी 55 लाख निधी मंजूर...जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट... वर्षा भेटीदरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती...
काँग्रेसकडे 1 हजार 688 इच्छुकांनी मागितली उमेदवारी, आजपासून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरूवात...प्रत्येक जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत निवड प्रक्रिया सुरु राहणार
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.