Uddhav Thackeray: मोफत शिक्षणासह उद्धव ठाकरेंनी दिली 'ही' 5 मोठी आश्वासने; कोल्हापुराच्या सभेत केली घोषणा

Uddhav Thackeray in Kolhapur: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रचारसभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रचारसभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.

महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत असताना उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल यासह 5 मोठी आश्वासने दिली आहेत. ही त्यांनी दिलेली आश्वासने येत्या काळात महाविकास आघाडीच्या दृष्टीने गेमचेंजर ठरणार का ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार

राज्यातील महायुती सरकारकडून केवळ विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची (MVA) सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगत मोठी घोषणा केली.

येत्या काळत राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

Uddhav Thackeray
MVA News : पुण्यातील बंडोबांचा थंडोबा करण्यात महाविकास आघाडी अपयशी

धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देणार

ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ. त्यासोबतच मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

शेतकऱ्यांना हमीभाव देणार

निवडणुकीनंतर राज्यात मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल. आमचे सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी केली 'या' 5 नेत्यांची हकालपट्टी

पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार

त्यासोबतच येत्या काळात आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवण्यात येतील असे आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मोदी-शाहांनी राज्यात ठाण मांडून बसावे

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना विनंती आहे की, पुढील 15 दिवस त्यांनी देशभरातली नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात राहावे. पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यासॊबतच राज्य सरकारने प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरायचं काम सुरु केले आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण दिसते. 1500 रुपये देऊन कुणाचं घर चालतं हे सांगावे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Shivsena News : राज्यातील सत्तेचा महामार्ग ठरविणार 'या' 49 जागांवरील लढती; उद्धव सेना की शिंदे सेना ठरणार वरचढ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com