Solapur, 15 April : मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशामुळे माळशिरस तालुक्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे, त्यातूनच माळशिरसमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मूळचे भाजपचे उत्तम जानकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने मुंबईला पाचारण केले आहे. ते सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर जानकर यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यातून जानकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे. त्यात भाजपला किती यश येते, हे पाहावे लागेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर रविवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे माढ्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मोहिते पाटील यांच्या पक्ष सोडण्यामुळे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने डावपेच आखायला सुरुवात केली आहे. त्यातूनच नाराज उत्तम जानकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहेत.
दुसरीकडे, सोलापूर लोकसभा आणि मागील विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून डावलण्यात आल्यामुळे उत्तम जानकर हे भाजपवर नाराज आहेत. हे मागील अनुभव लक्षात घेता कट्टर विरोधक मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेण्याबाबत सूतोवाच केले होते. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला मोहिते पाटील यांनी जानकर यांना मदत करायची, या रणनीतीवर त्यांची मोहिते पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू होती. हे समीकरण जुळल्यास माढ्यात भाजपची अडचण झाली असती, त्यातून फडणवीस यांनी तातडीने पावले उचलत जानकर यांना तातडीने मुंबईत पाचारण केले आहे.
फडणवीसांच्या निरोपानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजी पाटील हे उत्तम जानकर यांना घेऊन विशेष विमानाने मुंबईत पोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे, त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.