Solapur, 14 April : माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. तो कार्यक्रममध्ये अकलूजमध्ये सुरू आहे. धैर्यशील यांचा आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हेही लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय जनता पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) उमेदवारी डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धैर्यशील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यानंतर येत्या 16 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोलापूरला येणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, शरद पवार हे 26 एप्रिल रोजी पुन्हा माढ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. करमाळा येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे प्रवेश करणार आहेत. त्यानंतर अकलूज येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) हे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मात्र, अकलूज येथे होणाऱ्या सभेची तारीख समजू शकलेली नाही.
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्यापूर्वी रविवारी (ता. 14 एप्रिल) सकाळी ‘शिवरत्न’वर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्नेह भोजनाला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी ‘शिवरत्न’वर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या स्नेह भोजनाला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार धनाजी साठे, नारायण पाटील, डॉ. बाबासाहेब व अनिकेत देशमुख, अभिजित पाटील, बळीराम साठे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.