Fadnavis Call to Jankar : मोहिते पाटलांबरोबर एकत्र येण्याचे संकेत देणाऱ्या जानकरांना फडणवीसांकडून भेटीचा सांगावा

Lok Sabaha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्यासोबत एकत्र येण्याबाबतचे संकेत उत्तम जानकर यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने आज उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर भेटीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उत्तम जानकर यांची बैठक होणार आहे.
Uttam Jankar-Devendra Fadnavis
Uttam Jankar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur,14 April : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाजपच्या राजीनाम्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात वेगवान घडामोडी घडत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत मोहिते पाटील यांची रविवारी सकाळी डिनर डिप्लोमसी झाली. त्यानंतर माळशिरसमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्या (ता. १५ एप्रिल) सागर बंगल्यावर भेटीचे निमंत्रण आले आहे. जानकर यांनी दोन दिवसांपूर्वीच मोहिते पाटील यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत सूतोवाच केले होते.

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील (Mohite Patil) यांच्यासोबत एकत्र येण्याबाबतचे संकेत उत्तम जानकर यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने आज उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना सागर बंगल्यावर भेटीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत उत्तम जानकर यांची बैठक होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uttam Jankar-Devendra Fadnavis
Vijayshinh Mohite Patil News : अडचणीतील पवारांच्या मदतीला विजयदादाही येणार; लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार

मुंबईतील बैठकीनंतर सायंकाळी अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक होणार आहे. उद्या सकाळी उत्तम जानकर, सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील विशेष विमानाने मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती आहे.

उत्तम जानकर मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना उमेदवारी देण्यााबाबतही चर्चा झाली होती. मात्र, उत्तम जानकर यांचे नाव मागे पडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे जानकर हे नाराज होते.

Uttam Jankar-Devendra Fadnavis
Akluj Dinner Diplomacy : ‘शिवरत्न’वर ठरली सोलापूर-माढा लोकसभेची रणनीती

केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही पूर्वाश्रमीचे भाजप नेते असलेल्या उत्तम जानकर यांना पाठबळ मिळाले नाही. तसेच, मागील विधानसभा निवडणुकीतही ऐनवेळी राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, मोहिते पाटील यांच्याविरोधात लढून भाजप वाढविण्याचे, जिवंत ठेवण्याचे काम केले, त्या जानकर यांना डावलण्यात आले, असा जानकर समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे जानकर हे भाजपवर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर राम सातपुते यांना विजयासाठी झुंजवले होते. त्या निवडणुकीत सातपुते हे अवघ्या 2590 मतांनी निवडून आले होते.

Uttam Jankar-Devendra Fadnavis
Pawar PC In Akluj : मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा संदेश राज्यभरात जाईल; शरद पवारांचे सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com