Akola Lok Sabha Election : 'प्रेशर कुकर'मध्ये यंदा मतांची डाळ शिजणार का? काय आहे राजकीय माहोल?

Lok Sabha Election 2024 : वंचितच्या 'प्रेशर कुकर'मध्ये मतांची डाळ शिजणार की मतांचं विभाजन होऊन पुन्हा एकदा 'हाता'ला बाजूला सारत 'कमळ' फुलणार?
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

संदीप चव्हाण -

Akola News : अकोल्यात नेहमीप्रमाणं यंदाही तिरंगी लढत होतेय. जसा तापमानाचा पारा वाढतोय तसा राजकीय ज्वर देखील चढतोय. भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील आणि वंचितकडून डॉ. प्रकाश आंबेडकर. अकोल्यात यंदा वंचितच्या 'प्रेशर कुकर'मध्ये मतांची डाळ शिजणार की मतांचं विभाजन होऊन पुन्हा एकदा 'हाता'ला बाजूला सारत 'कमळ' फुलणार? अकोल्यात 'प्रेशर' कुणावर? 'कमळा'वर की 'हाता'वर? (Lok Sbha Lok Sabha 2024)

महाविकास आघाडी आणि वंचितचं जमणार नाही, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत होतं आणि अखेर तसंच घडलं. चर्चा अडली, बोलणी फिस्कटली आणि मग वंचितनं मागच्यासारखी वेगळी चूल मांडली. योगायोग पाहा, वंचितचे सर्वेसर्वा म्हणजे प्रकाश आंबेडकर ज्या अकोल्यातून निवडणूक लढवताहेत त्याठिकाणी त्यांना निवडणूक चिन्ह देखील काय मिळालं तर प्रेशर कुकर ! आता त्यांनीच मांडलेल्या या वेगळ्या राजकीय चुलीवर ठेवायला प्रेशर कुकर तर मिळाला खरा पण या 'प्रेशर कुकर'मधून यंदा मतांची डाळ शिजणार का? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Prakash Ambedkar
MNS News: महायुतीच्या प्रचारात आता मनसेच्या इंजिनचाही आवाज घुमणार; राज ठाकरेंचा मराठवाड्याबाबत मोठा निर्णय

प्रकाश आंबेडकर यंदा सलग अकराव्यांदा लोकसभेला उभे!

प्रकाश आंबेडकर आपल्या राजकीय आयुष्यात सलग 11 व्यांदा लोकसभा लढवताहेत. 1998 आणि 1999 असे दोन वेळा ते खासदारही झाले पण 9 वेळा त्यांच्या वाट्याला पराभव आला. कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या क्रमांकावर राहिले पण न थकता लोकसभा मात्र लढवतच राहिले. आतापर्यंत त्यांनी तीन वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आहेत. 1998 ला ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे RPI चे खासदार म्हणून निवडून आले तर 1999 मध्ये भारिप बहुजन महासंघाचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली मात्र त्यांचा भाजपच्या संजय धोत्रेंकडून पराभव झाला. काँग्रेसनं 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत हिदायतुल्लाह पटेलांना उमेदवारी दिल्यानं मतांमध्ये विभाजन झालं आणि त्याचा फटका आंबेडकरांना बसला तर त्याचा फायदा भाजपच्या संजय धोत्रेंना झाला. भाजपचे संजय धोत्रे सलग चार वेळा 2004 ते 2019) अकोल्याचे खासदार राहिले आहेत.

Prakash Ambedkar
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...

1998 व 1999 असा दोनदा विजय तर नऊ वेळा पराभव -

1998 आणि 1999 या दोन्ही निवडणुकांमध्ये आंबेडकरांनी भाजपच्या पांडुरंग फुंडकर यांना हरवलं होतं मात्र त्यानंतर आजअखेर त्यांना विजयासाठी झगडावं लागतंय. अकोल्याचं राजकीय समीकरण पाहिलं तर या ठिकाणी कायम तिरंगी लढत होते. त्यामुळं भाजप आणि काँग्रेसकडून उभ्या राहिलेल्या दोन्ही उमेदवारांमुळं मतांचं विभाजन होतं आणि त्याचा फटका आंबेडकरांना बसतो. या मत विभाजनामुळं ते कधी दुसऱ्या तर कधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातात.

अकोला मतदारसंघात ओबीसी, मुस्लीम, दलित, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा आदी मतदारांची संख्या मोठी आहे. यंदा मात्र आंबेडकरांनी 'सोशल इंजिनिअरिंग'वर भर देत या सकल समाजांची मतं आपल्याकडं कशी वळतील यावर भर दिलाय. आताच्या लढतीकडं पाहिलं तर ज्या भाजप उमेदवाराकडून आंबेडकर सलग चौथ्यांदा पराभूत झाले ते संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थ्यामुळं यंदा निवडणूक रिंगणात नाहीत. भाजपनं त्यांचे पुत्र अनुप धोत्रे हा नवखा चेहरा उभा केलाय शिवाय काँग्रेसनंही यावेळी मुस्लिम उमेदवार न देता डॉ. अभय पाटील या नव्या चेहऱ्याला संधी दिलीये.

Prakash Ambedkar
Fire In BJP office Mumbai : मोठी बातमी! मुंबईच्या भाजप कार्यालयात आगीचं थैमान; भीषण दुर्घटना...

याआधी तब्बल दहा वेळा निवडणूक लढवल्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आंबेडकरांसमोर यंदा दोन्हीही उमेदवार नवखे असल्यानं त्यांना अकोल्याचं मैदान मारण्याची नामी संधी आहे. आता जरा विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती कशी आहे हेही समजावून घेऊ... अकोला लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha) जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या सहापैकी अकोट, मूर्तिजापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम या चारही मतदारसंघांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. त्यामुळं येथील भाजपचे चारही आमदार अनुप धोत्रेंना निवडून आणण्यासाठी आणि भाजपचा गड बनलेला अकोला पुन्हा आपल्याकडंच राखण्यासाठी प्रयत्न करतील.

Prakash Ambedkar
BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...

तिकडं बाळापूर आणि रिसोड या दोन्ही ठिकाणचे आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजेच काँग्रेसच्या अभय पाटलांना मताधिक्य देण्याचा निश्चित प्रयत्न करतील. पण आंबेडकरांचं काय ? अकोल्यात त्यांचा कुणी आमदारही नाही की त्यांची कुणासोबत युती अथवा आघाडीही नाही. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता अकोट आणि अकोला पश्चिम वगळता उर्वरित चार मतदारसंघात वंचितनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत सर्वच ठिकाणी भाजपच्या मतांमध्ये घसरण झाली होती. त्यामुळं अकोल्यात वंचितसमोर सर्वांत मोठं आव्हान असणार आहे ते मतदान वाढवण्याचं..!

Prakash Ambedkar
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात

थोडक्यात काय तर प्रचाराची नानाविध आयुधं वापरून विविध समाजघटकांतील मतदारांना वंचितनं आपलंसं करून घेतलं तर अकोल्यात भाजप आणि कॉंग्रेसवरचं (Congress) 'प्रेशर' वाढत जाऊन प्रकाश आंबेडकरांनी चुलीवर ठेवलेल्या 'प्रेशर कुकर'मध्ये मतांची डाळ शिजू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com