अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : कुरुंदकरची राष्ट्रपती पुरस्कारासाठीची शिफारस रद्द 

PI KUrundkar - API AShwini Gore Bindre
PI KUrundkar - API AShwini Gore Bindre
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई  : मुंबई-बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण प्रकरणात पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यास   निलंबित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्याच्या नावाची करण्यात आलेली शिफारस देखील रद्द करण्यात आली  आहे.

 मुंबई-बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर आणि त्याचा साथीदार व राजेश पाटील यांनी हत्या करून त्यांचा मृतदेह भाईंदरच्या खाडीत फेकला असावा अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 7 ते 11 या वेळेत हत्या करण्यात आली आणि भाईंदर खाडी परिसरात कुरूंदकर आणि राजेश पाटील यांच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन दाखवत आहे. तर,बिद्रे हिचा मोबाईल त्याच रात्री 11 च्या सुमारास बंद झाल्याचे तपासात समोर आले आहे. 


 अश्विनी बिद्रे  या नवी मुंबई पोलिसांच्या मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या.गेल्या दीड वर्षापासून त्या बेपत्ता आहेत. 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरूंदकराला पोलिस ठाण्यात भेटायला गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाला. 

 याच दरम्यान कुरूंदकराने बिद्रे यांची कारमध्ये गळा दाबून किंवा गोळी झाडून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6.41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11:18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाल्याचे दाखवत आहे. 

ज्या वेळेस बिद्रे यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्याचे दाखवत आहे. त्याचवेळी अभय कुरूंदकराने त्याचा साथीदार आणि खडसेंचा भाचा राजेश पाटील याला फोन केल्याचे दाखवत आहे. 

त्यावेळी राजेश पाटील हा भाईंदरमधील एका बारमध्ये दारू पित बसला होता व कुरूंदकराने फोन करताच तो त्यांना भेटायला गेला. त्यानंतर या दोघांनी रात्री अश्विनी बिद्रेचा मृतदेह कारमधून काढून खाडी फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.

अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून हत्या केली व राजेश पाटीलच्या मदतीने भाईंदरच्या खाडीत फेकत त्याची विल्हेवाट लावल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मात्र पुरावा मिळत नसल्यामुळे पोलीस गप्प आहेत. 

ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे अश्विनी बिद्रे यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. कुरूंदकरला दोन मुलंही आहेत. बिंद्रे अपहरण प्रकरणात कुरुंदकर यांना निलंबित करण्यात आले आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com